राजामौलींचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर आहे सर्वाधीक रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:41 PM2023-10-10T16:41:18+5:302023-10-10T16:41:59+5:30

एस. एस. राजामौलींनी ज्यु. एनटीआर मुख्य भुमिकेत असलेल्या तेलुगू चित्रपट स्टुडंट नं. १ द्वारे २००१ मध्ये दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले.

Rajamouli's movie is popular, has the highest rating on IMDb | राजामौलींचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर आहे सर्वाधीक रेटिंग

राजामौलींचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर आहे सर्वाधीक रेटिंग

एस. एस. राजामौलींनी ज्यु. एनटीआर मुख्य भुमिकेत असलेल्या तेलुगू चित्रपट स्टुडंट नं. १ द्वारे २००१ मध्ये दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले. लवकरच त्यांना पूर्ण भारतामध्ये प्रसिद्धी मिळाली व बॉक्स ऑफीसवर त्यांना मगधीरा, एगा, आणि बाहुबली: द बिगिनिंग अशा चित्रपटांद्वारे मोठे यश मिळाले. २०१६ मध्ये राजामौलींना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देण्यात आला. त्यांचा पुढील प्रकल्प हा पूर्ण देशभरातील पौराणिक चित्रपट असून त्याचे नाव एसएएमबी २९ आहे आणि त्यात महेश बाबू मुख्य भुमिकेत आहे.

 IMDb वरील राजामौलींची सर्वोच्च रेटींग असलेली टॉप १० टायटल्स अशी आहेत:

बाहुबली २: द कन्क्लुजन - ८.२
बाहुबली: द बीगिनिंग - ८.०
RRR - ७.८
एगा - ७.७
विक्रमारकुदू - ७.७
मगधीरा - ७.७
छत्रपती - ७.६
मर्यादा रामाना - ७.४
चॅलेंज - ७.४

आगामी प्रोजेक्ट
'बाहुबली' आणि 'RRR' च्या घवघवीत यशानंतर आता दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. याचं नाव आहे 'मेड इन इंडिया'. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर हा सिनेमा आधारित असेल. कारण 'मेड इन इंडिया' भारतीय सिनेमाची कहाणी दाखवणार आहे. दादासाहेब फाळकेंनी भारतीय सिनेमाचा पाया रचला. १९१३ साली त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला मूक सिनेमा बनवला.

Web Title: Rajamouli's movie is popular, has the highest rating on IMDb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.