Oscarच्या शर्यतीतून भारताचा '2018' सिनेमा बाहेर, २० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले १०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 03:06 PM2023-12-22T15:06:59+5:302023-12-22T15:09:05+5:30

'2018 : एव्हरीवन इज हिरो' या भारतीय चित्रपटाला ऑस्कर २०२४चं तिकीट मिळालं होतं. पण, हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

oscar 2024 indias official entry 2018 everyone is hero malyalam movie out of the race | Oscarच्या शर्यतीतून भारताचा '2018' सिनेमा बाहेर, २० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले १०० कोटी

Oscarच्या शर्यतीतून भारताचा '2018' सिनेमा बाहेर, २० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले १०० कोटी

Oscar 2024: '2018 : एव्हरीवन इज हिरो' या भारतीय चित्रपटाला ऑस्कर २०२४चं तिकीट मिळालं होतं. पण, हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताकडून फॉरेन लँगवेज कॅटेगरीत '2018' हा मल्याळम चित्रपट पाठविण्यात आला होता. पण, आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे यंदा भारताचा एकही चित्रपट ऑस्करमध्ये नसणार आहे. 

'2018' चित्रपटाची कथा केरळमध्ये आलेल्या पूरावर आधारित आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला होती. केरळमध्ये आलेल्या पूराचं मोठ्या पडद्यावर मांडलेलं हे वास्तवदर्शी चित्रण पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ५ मेला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन ज्यूड अँथनी जोसेफ यांनी केलं आहे. १२ कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळेच या सिनेमाला भारताकडून ऑस्करचं तिकिट मिळालं होतं. पण, आता हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 

गेल्या वर्षी ऑस्करमध्ये RRR या सिनेमाने बाजी मारली होती. बेस्ट रिजनल साँग या कॅटेगरीत RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला अवॉर्ड मिळाला होता. तर 'द एलिफंट व्हिस्परर्स' या डॉक्युमेंटरी फिल्मलाही ऑस्कर मिळाला होता.

Web Title: oscar 2024 indias official entry 2018 everyone is hero malyalam movie out of the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.