सोनालीने सांगितला साऊथ स्टारसोबत काम करण्याचा एक्सपिरिअन्स; 'पहिल्याच सिनेमात..'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:18 PM2024-02-02T15:18:18+5:302024-02-02T15:19:31+5:30

Sonalee kulkarni: सोनाली मलाइकोट्टाई वालिबान या मल्याळम सिनेमात झळकली आहे.

marathi actress sonalee kulkarni talks about the experience of working with South Star | सोनालीने सांगितला साऊथ स्टारसोबत काम करण्याचा एक्सपिरिअन्स; 'पहिल्याच सिनेमात..'

सोनालीने सांगितला साऊथ स्टारसोबत काम करण्याचा एक्सपिरिअन्स; 'पहिल्याच सिनेमात..'

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर सोनालीने साऊथ सिनेमातही एन्ट्री केली आहे. नुकताच तिचा मलाइकोट्टाई वालिबान हा मल्याळम सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमामुळ सोनाली सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच तिने साऊथच्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा असतो हे सांगितलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या सिनेमात सोनालीने दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. यावेळी साऊथ कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता. त्या इंडस्ट्रीतले लोक कसे आहेत हे तिने सांगितलं.

'मलाइकोट्टाई वालिबान' हा माझा पहिलाच मल्याळम सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली याच गोष्टीचा खूप आनंद आहे. जगभरात हा सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
दरम्यान, सोनालीचा हा सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. हा सिनेमा देशासह युके, युएस, कॅनडासह या देशांमध्येही रिलीज झाला आहे.

Web Title: marathi actress sonalee kulkarni talks about the experience of working with South Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.