प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:55 IST2025-10-17T11:54:48+5:302025-10-17T11:55:30+5:30
प्रसिद्ध कॉमेडियनसोबत पहिल्यांदा थाटला होता संसार, ६ वर्षात झालेला घटस्फोट

प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
मनोरंजनविश्वात अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसात गुडन्यूज दिली आहे. कोणी लग्न केलं तर कोणी आईबाबा झाले आहेत. कॉमेडियन अबिश मॅथ्यूची पहिली पत्नी मल्याळम अभिनेत्री अर्चना कवीने गुपचूप दुसरं लग्न केलं आहे. रिक वर्गीससोबत तिने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अर्चना रिकसोबत खूपच खूश दिसत आहे.
टीव्ही अँकर धान्या वर्माने मैत्रीण अर्चना कवीसाठी पोस्ट लिहिली. तिने अर्चना आणि रिकच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत लिहिले, '...आणि माझ्या डार्लिंगचं लग्न झालं. अर्चना कवी आणि रिक वर्गीस'.
गुलाबी रंगाच्या साडीत अर्चना खूपच सुंदर दिसत आहे. तिने डोक्यावरुन पदर घेतला आहे. तर नाजूक ज्वेलरीही घातली आहे. तसंच डार्क रंगाच्या सूट बूटमध्ये रिक हँडसम दिसत आहे. लग्नानंतरचं त्यांचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्चना कवीने 'नीलथमारा' या सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली. २००९ साली हा सिनेमा आला होता. 'ममी अँड मी','सॉल्ट एन पेपर','बेस्ट ऑफ लक','अरावन' अशा सिनेमांमध्ये ती दिसली. २०१५ साली तिने कॉमेडियन अबिश मॅथ्यूशी लग्न केलं. काही मतभेदांमुळे त्यांनी २०२१ साली घटस्फोट घेतला होता.