KGF स्टार यश 'जय हनुमान'मध्ये बनणार हनुमान?, अभिनेत्याच्या टीमने दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 03:51 PM2024-02-16T15:51:43+5:302024-02-16T15:52:12+5:30

Yash : प्रशांत वर्माच्या 'हनुमान' चित्रपटात KGF स्टार यश मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

KGF star Yash to play Hanuman in 'Jai Hanuman'?, updates from the actor's team | KGF स्टार यश 'जय हनुमान'मध्ये बनणार हनुमान?, अभिनेत्याच्या टीमने दिली अपडेट

KGF स्टार यश 'जय हनुमान'मध्ये बनणार हनुमान?, अभिनेत्याच्या टीमने दिली अपडेट

प्रशांत वर्माच्या 'हनुमान' (Hanuman Movie)चित्रपटात KGF स्टार यश (Yash) मुख्य भूमिकेत दिसणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. म्हणजेच या चित्रपटात तो हनुमानाची भूमिका साकारणार आहे. पण त्याच्या टीमचे म्हणणे वेगळेच आहे. यश सध्या नितेश तिवारीच्या बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट 'रामायण'मुळे चर्चेत आहे. यश यात रावणाची भूमिका साकारणार आहे. ही बाब समोर आल्यापासून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दरम्यान, अशी बातमी आली होती की, तो प्रशांत वर्माच्या 'हनुमान'च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. आता यावर एक नवीन अपडेट आली आहे.

यशच्या टीमने या वृत्तांचे खंडन केले असून अभिनेता 'हनुमान' चित्रपटाचा भाग होणार नसल्याचे म्हटले आहे. तो हा चित्रपट करत नाहीये. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, यशच्या टीममधील एका सूत्राने सांगितले की, हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि खोटे आहे. या बातम्यांमध्ये तथ्य नाही.

सध्या यशचे लक्ष 'टॉक्सिक'वर 
सूत्रांनी पुढे सांगितले की यश अशा कोणत्याही भूमिकेचा विचार करत नाही. रॉकिंग स्टार यश त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी बराच वेळ घेतो आणि विचार करतो आणि सध्या तो 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' मध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. प्रशांत वर्माचा 'हनुमान' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे आणि तो अजूनही चित्रपटगृहांमध्ये चालू आहे.

रामायणात साकारणार रावण 
नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटाबाबत यशचे नाव सतत चर्चेत असते. या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी यशने होकार दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, गेल्या वर्षी काही रिपोर्ट्समध्ये यशने रावणाची भूमिका नाकारल्याचा दावा केला होता. मात्र आता पुन्हा एकदा यश हा 'रामायण'चा भाग असून तो रावण होणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत यशकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

Web Title: KGF star Yash to play Hanuman in 'Jai Hanuman'?, updates from the actor's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.