८०० कोटींचा हीट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:53 IST2026-01-06T15:52:16+5:302026-01-06T15:53:33+5:30
'टॉक्सिक' चित्रपटात सूट-बूट, डोक्यावर टोपी, गळ्यात चैन आणि तोंडात सिगार असा यशचा डॅशिंग लूक आहे.

८०० कोटींचा हीट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, ओळखलं का?
सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. आज ६ जानेवारी २०२६ रोजी या चित्रपटातील अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिचा दमदार फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये रुक्मिणी वसंत एका गर्दीच्या कॉरिडॉरमधून अत्यंत आत्मविश्वासाने चालताना दिसत आहे. तिने परिधान केलेला गडद निळ्या रंगाचा हाय-स्लिट गाऊन आणि हातातील क्लच तिच्या पात्राला एक रहस्यमय आणि ग्लॅमरस लूक देत आहे. सोशल मीडियावर या पोस्टरने येताच धुमाकूळ घातला असून, खुद्द कियारा अडवाणीनेही रुक्मिणीचा फोटो शेअर करत तिचे कौतुक केले आहे.
'कांतारा'नंतर पुन्हा एकदा मोठा धमाका
रुक्मिणी वसंतने याआधी ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: अ लेजेंड - चॅप्टर १' मध्ये कनकवतीची भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली होती. हा चित्रपट २०२५ मधील दुसरा सर्वात मोठा हिट ठरला होता. आता 'टॉक्सिक'मध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यशसोबत तिची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'टॉक्सिक'ची तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात केवळ यश आणि रुक्मिणीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी या अभिनेत्रीदेखील या चित्रपटात दिसतील.