Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:25 IST2025-10-06T10:25:16+5:302025-10-06T10:25:40+5:30
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करत आहेत.

Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
'दशावतार' सिनेमानंतर प्रेक्षकांना आतुरता होती ती 'कांतारा: चॅप्टर १' या साऊथ सिनेमाची. ऋषभ शेट्टीचं लेखन आणि दिग्दर्शन असलेला 'कांतारा: चॅप्टर १' अखेर दसऱ्याच्या मुहुर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करत आहेत.
'कांतारा: चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ऋषभ शेट्टीच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल ६१.८५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी ४६ कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या तीनच दिवसांत 'कांतारा: चॅप्टर १'ने भारतात तब्बल १६२.४४ कोटींचा गल्ला जमवला. केवळ भारतातच नाही तर जगभरात 'कांतारा: चॅप्टर १' सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
'कांतारा: चॅप्टर १' सिनेमाने चौथ्या दिवशी भारतात ६१.५ कोटींची कमाई केली आहे. चार दिवसांत 'कांतारा: चॅप्टर १'ने देशात २२४ कोटींचा गल्ला जमवला. तर जगभरात या सिनेमाने चारच दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा कन्नडसह हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.