VIDEO: कोटा श्रीनिवास राव यांना अखेरचा निरोप देताना ब्रह्मानंदम ढसढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 14:18 IST2025-07-13T14:17:48+5:302025-07-13T14:18:11+5:30

कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने ब्रह्मानंदमवर कोसळला दु:खाचा डोंगर

Brahmanandam Bursts Into Tears Over Kota Srinivasa Rao Death See Video | VIDEO: कोटा श्रीनिवास राव यांना अखेरचा निरोप देताना ब्रह्मानंदम ढसढसा रडला

VIDEO: कोटा श्रीनिवास राव यांना अखेरचा निरोप देताना ब्रह्मानंदम ढसढसा रडला

Kota Srinivasa Rao Funeral: दिग्गज कलाकार कोटा श्रीनिवास राव यांचे आज ८३ व्या वर्षी निधन झाले. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला. दमदार अभिनय आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे कोटा श्रीनिवास राव हे दाक्षिणात्य  चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता होते. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांचे डोळे पाणावले. साऊथ चित्रपटांतील सर्वात लोकप्रिय असलेले कॉमेडियन ब्रह्मानंदम (Brahmanandam) हे कोटा श्रीनिवास राव यांचे अखेरचे दर्शन घेताना ढसढसा रडले आहेत. 

कॉमेडियन ब्रह्मानंदम हे कोटा श्रीनिवास राव त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. यावेळी ब्रह्मानंदम आपल्या भावना रोखू शकले नाहीत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते कोटा श्रीनिवास राव यांच्या पार्थिवाजवळ रडताना दिसतात. इतकंच नाही तर ढसाढसा रडत असलेल्या ब्रह्मानंदमना समजवण्यासाठी इतर सहकलाकारांना पुढं यावं लागलं.

कोटा श्रीनिवास राव आणि ब्रह्मानंदम यांचं मैत्री ४० वर्षांहून अधिक काळापासून होती. त्यांनी एकत्र असंख्य चित्रपटांत काम केलं. दोघांनी एकमेंकाना आयुष्याच्या चढउतारात साथ दिली. त्यामुळे कोटा यांच्या जाण्याचं दु:ख ब्रह्मानंदमसाठी केवळ सहकलाकार नाही तर कुटुंबातील एक सदस्य हरपल्यासारखं आहे.

जवळपास ७५० सिनेमे नावावर...

कोटा श्रीनिवास राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांनी १९७८ मध्ये 'प्रणम खारीदू' या चित्रपटातून पदार्पण केले. ४० वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी ७५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९९९ ते २००४ पर्यंत ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा पूर्वेचे आमदारही होते. दम्मू', 'सन ऑफ सत्यमूर्ती' आणि 'डेंजरस खिलाडी' हे त्यांच्या गाजलेल्या भुमिकांपैकी काही चित्रपट आहेत.
 

Web Title: Brahmanandam Bursts Into Tears Over Kota Srinivasa Rao Death See Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.