अल्लू अर्जुनवर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:41 IST2025-08-30T13:41:26+5:302025-08-30T13:41:48+5:30
Allu Arjun's grandmother passes away : साउथ सिनेइंडस्ट्रीतला सुपरस्टार अल्लू अर्जुनची आजी अल्लू कनकरत्नम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. आजीच्या निधनाची बातमी कळताच अल्लू अर्जुन मुंबईहून हैदराबादला पोहोचला. यावेळी अल्लू अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अल्लू अर्जुनवर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं झालं निधन
साउथ सिनेइंडस्ट्रीतला स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)ला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला 'पुष्पा' या चित्रपटातून जगभरात लोकप्रियता मिळाली. सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याची आजी आणि ज्येष्ठ अभिनेते अल्लू रामलिंगय्या यांच्या पत्नी अल्लू कनकरत्नम ( Allu Kanaka Ratnamma ) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
अल्लू अर्जुन यांच्या आजीचे शनिवारी सकाळी त्यांच्या हैदराबाद येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. अल्लू कनकरत्नम आजारी होत्या आणि त्यामुळे त्यांची वयाच्या ९४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. अल्लू अर्जुनचे त्याच्या आजीसोबत खूप छान बॉण्डिंग होते. तो त्याच्या आजीसोबत चित्रपटाशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे. सध्या अभिनेता एटलीसोबत त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे आणि त्यासाठी तो मुंबईत होता. मात्र, त्याच्या आजीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर तो हैदराबादला पोहोचला आहे. जिथे विमानतळावरून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कोकापेट येथे होणार अंत्यसंस्कार
अभिनेता अल्लू अर्जुनची आजी अल्लू कनकरत्नम यांच्या पार्थिवावर आज दुपारी म्हणजे ३० ऑगस्ट रोजी कोकापेट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अल्लू अर्जुनच्या आजीच्या निधनाची माहिती मिळताच अभिनेत्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या आजीला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.