'वॉर २'नंतर ज्युनिअर एनटीआर दिसणार या दोन सिनेमामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:16 IST2025-08-26T17:15:56+5:302025-08-26T17:16:20+5:30
Jr NTR : बॉलिवूडमध्ये बराच काळ वाट पाहिल्यानंतर ज्युनिअर एनटीआरने 'वॉर २' या चित्रपटाद्वारे अखेर प्रवेश केला आहे.

'वॉर २'नंतर ज्युनिअर एनटीआर दिसणार या दोन सिनेमामध्ये
बॉलिवूडमध्ये बराच काळ वाट पाहिल्यानंतर ज्युनिअर एनटीआर( Jr NTR)ने 'वॉर २' (War 2 Movie) या चित्रपटाद्वारे अखेर प्रवेश केला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ही एक हाय-ऑक्टेन स्पाय थ्रिलर आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि कियारा अडवाणी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. YRFच्या बॅनरखाली तयार झालेला 'वॉर २' हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी प्रदर्शित झाला. आता इंडस्ट्रीतील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, '''वॉर २' नंतर ज्युनिअर एनटीआर आपल्या पुढच्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्सवर, म्हणजेच प्रशांत नीलसोबतच्या चित्रपटावर आणि नंतर 'देवरा २' वर काम सुरू करणार आहे. हे आधीच ठरलेलं होतं आणि या प्लॅनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. संपूर्ण टीम तयारीला लागली आहे आणि कामाची सुरुवातही झाली आहे.''
यापूर्वी अशाही बातम्या आल्या होत्या की, ज्युनिअर एनटीआरने यशराज फिल्म्ससोबत वॉर फ्रँचायझी व्यतिरिक्त मल्टी-फिल्म डील साइन केली आहे, ज्यामध्ये एक सोलो फिल्म देखील आहे. मात्र, आता समोर आलेल्या नव्या माहितीप्रमाणे, ज्युनिअर एनटीआर आपल्या आधीच्या कमिटमेंट्समुळे हे नवीन प्रोजेक्ट्स काही काळासाठी पुढे ढकलत आहेत. तरीही, एनटीआरची सुरुवातीपासूनच ही योजना होती की, 'वॉर २' नंतर ते सर्वप्रथम प्रशांत नीलच्या चित्रपटावर काम करतील आणि त्यानंतर 'देवरा २'वर लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे हे काही नवीन नाही. त्यामुळे यशराज फिल्म्सच्या प्रोजेक्टवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
ज्युनिअर एनटीआर आणि प्रशांत नील यांचा जो आगामी चित्रपट आहे, त्याचा टेंटेटिव्ह टायटल 'ड्रॅगन' असं ठेवण्यात आलं आहे. तसेच 'देवरा' ही ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेली एक अॅक्शन-ड्रामा फिल्म होती, ज्याचा हा सीक्वल आहे.