विराट-अनुष्कानंतर आणखी एका सेलिब्रिटीने केलं बाळाचं स्वागत, एक वर्षापूर्वीच वडिलांना गमावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:58 PM2024-02-22T12:58:11+5:302024-02-22T12:59:34+5:30

विराटनंतर आणखी एका सेलिब्रिटीने नुकतंच सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर केली आहे. 

After Virat Kohli and Anushka Sharma south actor Nikhil Siddhartha welcomed baby boy | विराट-अनुष्कानंतर आणखी एका सेलिब्रिटीने केलं बाळाचं स्वागत, एक वर्षापूर्वीच वडिलांना गमावलं

विराट-अनुष्कानंतर आणखी एका सेलिब्रिटीने केलं बाळाचं स्वागत, एक वर्षापूर्वीच वडिलांना गमावलं

मनोरंदनविश्वात सध्या अनेक सेलिब्रिटी गुडन्यूज देत आहेत. कोणी लग्नबंधनात अडकलं आहे तर कोणाच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. दोन दिवसांपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माने (Anushka Sharma) मुलगा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्याचं नावही 'अकाय' असल्याचं जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर फक्त ज्युनिअर विराटचीच चर्चा होती. आता विराटनंतर आणखी एका सेलिब्रिटीने नुकतंच सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर केली आहे. 

दाक्षिणात्य अभिनेता निखिल सिद्धार्थ (Nikhil Siddhartha) आणि पत्नी पल्लवी वर्मा (Pallavi Vrama) यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. पल्लवीने बुधवारी हैदराबादच्या खाजगी रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. निखिलने ही खुशखबर चाहत्यांसोबत शेअर करत भावूक कॅप्शनही लिहिलं. त्याने बाळासोबतचा एक छानसा फोटो शेअर करत लिहिले, "एक वर्षापूर्वी मी वडिलांना गमावलं आणि आज आम्ही माझ्या मुलाचं स्वागत करत आहोत. माझे वडीलच पुन्हा आमच्यासोबत आल्यासारखं वाटलं. मला सांगताना खूप आनंद होत आहे की पल्लवी आणि मी एका मुलाचे आई बाबा झालो आहोत. खूप भावूक आणि आनंदी क्षण."

सध्या निखिल आणि पल्लवीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. दोघांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर 4 वर्षांनंतर त्यांनी पहिल्या बाळाला जन्म दिला. निखिल गेल्या वर्षी एका स्पाय फिल्ममध्ये झळकला होता. मात्र हा सिनेमा फार चालला नव्हता. आता तो लवकरच 'स्वयंभू' या पीरियड ड्रामा मध्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title: After Virat Kohli and Anushka Sharma south actor Nikhil Siddhartha welcomed baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.