'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय खन्नाने सुरू केलं 'महाकाली' सिनेमाचं शूटिंग, सेटवरचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:06 IST2026-01-02T11:06:20+5:302026-01-02T11:06:52+5:30
'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय खन्नाने त्याच्या नव्या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे. अभिनेत्याने 'महाकाली' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय खन्नाने सुरू केलं 'महाकाली' सिनेमाचं शूटिंग, सेटवरचे फोटो समोर
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. 'धुरंधर'मुळे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर अक्षय खन्नाने दृश्यम ३ मधून एक्झिट घेतली आहे. धुरंधरनंतर अक्षय खन्ना 'दृश्यम ३' आणि 'महाकाली' या दोन मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार होता. मात्र डिमांड वाढल्याने आणि निर्मात्यांसोबत मतभेद झाल्याने अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून काढता पाय घेतला होता. आता 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या नव्या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे.
'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाच्या 'महाकाली' सिनेमातील लूक व्हायरल झाला होता. आता अभिनेत्याने 'महाकाली' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सिनेमाच्या शूटिंग सेटवरचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये अक्षय खन्नाने दिग्दर्शक पूजा कोल्लुरूसोबत सेल्फी घेतल्याचंही दिसत आहे. 'महाकाली' हा साऊथ सिनेमा आहे. या सिनेमातून अक्षय खन्ना साऊथमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय खन्ना या सिनेमात शुक्राचार्य ही भूमिका साकारणार आहे.
'महाकाली'मधील अक्षय खन्नाचा शुक्राचार्यांच्या भूमिकेतील लूक व्हायरल झाला होता. केसांटी जटा, पांढरी दाढी आणि हादरवून टाकणारे डोळे असा अक्षय खन्ना लूक पाहून चाहत्यांनाही 'महाकाली' सिनेमाबाबत उत्सुकता होती. २०२६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.