"दोन-तीन वेळा लैंगिक शोषण झालं अन्…", प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:08 IST2025-10-23T11:01:09+5:302025-10-23T11:08:13+5:30
प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला-"घराजवळील एका दुकानदाराने..."

"दोन-तीन वेळा लैंगिक शोषण झालं अन्…", प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला...
South Actor: पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुंबई पुलिस तसेच तियान यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे निहाल पिलाई. अभिनेता निहाल पिल्लई, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया मोहनचा पती आहे. सध्या हा अभिनेता त्याच्या चित्रपटामुळे नाहीतर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेता निहाल पिलाई हा 'ओरु हैप्पी फॅमिली' नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. त्यामाध्यमातून अभिनेता त्याच्या आगामी प्रोजेक्टसह वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स चाहत्यांना देत असतो. अलिकडेच अभिनेत्याने त्याच्या या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने बालपणीच्या काही कटू आठवणी सांगितल्या. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने त्याचा लहानपणी लैंगिक छळ झाला होता, असं सांगितलं. आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअ केलेल्या व्हिडीओमध्ये निहालने म्हटलंय, लहान असताना त्याच्या घराजवळील एका दुकानदाराकडून त्याला विचित्र अनुभव आला होता. ही आयुष्यातील एक वाईट आठवण आहे जी कधीच विसरू शकत नाही, असं तो म्हणाला. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्या घटनेविषयी बोलताना त्याने म्हटलं, "मी याबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला कारण माझ्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांच्या मुलासोबतही असं घडल्याचं सांगितलं. शिवाय हल्ली बाल लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत. मी सुद्धा अशाच अनुभवातून गेलो आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी याबद्दल बोलेन. माझं दोन-तीन वेळा लैंगिक शोषण झालं आणि त्यापैकी दोन घटना खूप वाईट होत्या."
मग पुढे निहालने म्हटलं,"माझ्या घराजवळ एक चपलांचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये एक माणूस काम करायचा. तेव्हा मी साधारण ८-९ वर्षांचा असेन. तेव्हा त्या दुकानातील तो माणूस आम्हाला फुटबॉल स्टिकर्स देतो असं म्हणून बोलावायचा. असंच एकेदिवशी तो आम्हाला म्हणाला, जर आम्ही आत आलो तर तो आम्हाला अजून जास्त स्टिकर्स देईल. आम्ही तीन मुले होतो. त्यानंतर आम्ही दुकानाच्या आत गेलो आणि त्याने आमच्या खाजगी भागांना स्पर्श केला की नाही हे मला नक्की आठवत नाही, पण त्याने दुसऱ्या एका मुलाला आत बोलावून त्याचे शॉर्ट्स ओढण्याचा प्रयत्न केला हे मला आठवते. त्यानंतर आम्ही कधीच तिथे गेलो नाही." असा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर केला.