कार्तिक कुमार आहे गे? घटस्फोटानंतर 7 वर्षाने सुचित्राचा आरोप; अभिनेता म्हणाला, 'लाज वाटण्यासारखी..';

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:30 PM2024-05-16T12:30:28+5:302024-05-16T12:31:03+5:30

Karthik kumar:घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर सुचित्राने कार्तिकवर अनेक आरोप केले आहेत. यात तो गे असल्याचंही तिने म्हटलं आहे.

south-cinema-karthik-kumar-gave-befitting-reply-to-singer-ex-wife-suchitra-who-make-allegations-that-he-is-gay-video-viral | कार्तिक कुमार आहे गे? घटस्फोटानंतर 7 वर्षाने सुचित्राचा आरोप; अभिनेता म्हणाला, 'लाज वाटण्यासारखी..';

कार्तिक कुमार आहे गे? घटस्फोटानंतर 7 वर्षाने सुचित्राचा आरोप; अभिनेता म्हणाला, 'लाज वाटण्यासारखी..';

कलाविश्वात एखाद्या सेलिब्रिटीचं ब्रेकअप होणं किंवा घटस्फोट होणं ही काही नवीन गोष्ट नाही. इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी सर्रास कलाकारांच्या आयुष्यात घडतात. यात काही अशाही जोड्या आहेत. ज्यांनी विभक्त झाल्यानंतरही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यात सध्या प्रसिद्ध गायिका सुचित्रा हिची चर्चा रंगली आहे. सुचित्राने तिच्या पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता कार्तिक कुमार याच्यावर बरेच आरोप केले आहे. यात कार्तिक गे असल्याचं तिने म्हटलं आहे.

कार्तिक आणि सुचित्रा यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर तब्बल ७ वर्षानंतर तिने कार्तिकवर काही आरोप केले आहेत. यात तो गे असल्याचं म्हटलं आहे. यावर कार्तिकने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. 

सुचित्राच्या आरोपांवर कार्तिकचं सडेतोड उत्तर

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक  व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. "मी होमोसेक्शुअल आहे की नाही.. मी होमोसेक्शुअल असेन तर मला नक्कीच त्याची लाज वाटणार नाही. सेक्शुअॅलिटीविषयी जितकी स्पेक्ट्रस आहेत. त्याच्यापैकी मी कोणीही असलो तरी तरी मला नक्कीच त्याचा गर्व वाटेल. मला त्याची लाज वाटणार नाही. मी माझ्या शहरात निघणाऱ्या प्राइड रॅलीत सहभागी होईन. यात लाज वाटण्यासारखी कोणती गोष्ट नाही. ही अभिमानास्पद गोष्ट आहे", असं कार्तिक कुमार म्हणाला.

काय आहेत सुचित्राचे आरोप

अलिकडेच सुचित्राने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कार्तिक गे असून त्याचे आणि धनुषचे काही संबंध आहेत. तसंच अमृताने त्याच्यासोबत लग्न करुन मोठी चूक केल्याचं तिने म्हटलं होतं. यावर, कार्तिकने उत्तर दिलं आहे.

दरम्यान, कार्तिकने सुचित्राचं नाव न घेता तिला सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होतो हे नेटकऱ्यांनी बरोबर ओळखलं. सोबतच त्याने LGBTQA+ कम्युनिटीला पाठिंबा दिल्यामुळे त्याचं कौतुकही केलं जात आहे.

Web Title: south-cinema-karthik-kumar-gave-befitting-reply-to-singer-ex-wife-suchitra-who-make-allegations-that-he-is-gay-video-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.