पावसाच्या आनंदात सोनाली कुलकर्णीचा डान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 04:17 IST2016-07-10T04:17:22+5:302016-07-10T04:17:22+5:30

पावसाळ्यातबाहेर सगळीकडे एकदमच रोमँटिक वातावरण झालेले असते. त्यावेळी काहींना तर बेधुंद, मनसोक्त डान्स करण्याचीदेखील इच्छा होत असते. आता पाहा ना, आपली अप्सरा

Sonali Kulkarni dance in the rainy season | पावसाच्या आनंदात सोनाली कुलकर्णीचा डान्स

पावसाच्या आनंदात सोनाली कुलकर्णीचा डान्स

पावसाळ्यातबाहेर सगळीकडे एकदमच रोमँटिक वातावरण झालेले असते. त्यावेळी काहींना तर बेधुंद, मनसोक्त डान्स करण्याचीदेखील इच्छा होत असते. आता पाहा ना, आपली अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी ही किती उत्तम डान्सर आहे ते तर आपल्या सर्वांनाच माहितीय. तिच्या नृत्याची जादू तर सर्वांनीच अनुभवलीय, पण आता या अप्सरेला पुन्हा एकदा पावसात डान्स करण्याचा मोह झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की, सोनाली पावसाचा आनंद घेत पावसात चिंब भिजली आहे का? तर असे काहीच नाही.
एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बाहेर पाऊस पडत असताना सोनालीने आतमध्ये डान्स करण्याचा पुरेपूर आनंद घेतला आहे. पिंक कलरच्या सुंदर घागऱ्यामध्ये ठुमके लावतानाचे सोनालीचे फोटो सोशल साइट्सवर वायरल झाले असून, ‘वीकेंड स्पेशल पिक्चर.. रेन मेक इट सो स्पेशल,’ असे कॅप्शन सोनालीने या फोटोला दिली आहे. याबद्दल सोनालीला विचारले असता तिने सांगितले, ‘मी एका चित्रटाच्या शूटिंगमध्ये असताना हा फोटो काढला. बाहेर मस्तपैकी पाऊस पडत होता अन् मी आत डान्स करीत होते.’ सोनाली कोणत्या चित्रपटाच्या सेटवर नाचायचा आनंद घेत होेती, हे तर तिने काही सांगितले नाही, पण आपल्याला काही दिवसांतच तिच्या या आगामी सिनेमाविषयी समजेल. तोवर सोनालीचा हा डान्स एन्जॉय करू या.

Web Title: Sonali Kulkarni dance in the rainy season