सोनाक्षी ठरतेय स्टाइल आयकॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 02:47 IST2017-01-25T02:47:46+5:302017-01-25T02:47:46+5:30

जेव्हा सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्या अभिनयावर होत्या.

Sonakshi is the style icon | सोनाक्षी ठरतेय स्टाइल आयकॉन

सोनाक्षी ठरतेय स्टाइल आयकॉन

जेव्हा सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्या अभिनयावर होत्या. मात्र आता जसजशा सोनाक्षी सिन्हा यशाच्या पायऱ्या चढतेय ते बघून तिने प्रत्येक गोष्टींवर लक्षकेंद्रीत केल्याचे पाहायला मिळतंय. आता सोनाक्षी ही फक्त आपल्या एक्टींग स्किल्सवरच नाहीतर आता तिच्या स्टाइल्समुळेही खूप चर्चेत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात तिच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळाल्या. एका कार्यक्रमात तिची इंडोवेस्टर्न स्टाइल पाहायला मिळाल्या. वेस्टर्न आऊटफिटवर तिने वेणी ठेवत हेअरस्टाइल केली होती.सध्या सोनाक्षी फक्त तिच्या एक्टींगवरच नाहीतर तिच्या स्टाइलवरही खूप मेहनत घेताना दिसतेय.त्यामुळे आता फक्त बिनधास्त दिसणारी सोनाक्षी आता स्टाइलिश सोनाक्षी म्हणूनही एस्टाब्लिश होताना दिसतेय. फोर्स-2 सिनेमाच्या प्रमोशनवेळीही सोनाक्षीने स्पोर्टींग आऊटफिट घालत रसिकांची वाहवा मिळवली होती. त्यावेळी अभिनयासह तिने 'स्टायलिश' या कॅटेगरित ही आपला शिक्कामोर्तब केल्याचे फक्त आॅनस्क्रिनच नाहीतर आॅफस्क्रिनही पाहायला मिळतंय.

Web Title: Sonakshi is the style icon