सोनाक्षीच्या परफॉर्मन्सची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 02:31 IST2016-11-19T02:31:37+5:302016-11-19T02:31:37+5:30

ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल आजपासून मुंबईत सुरू होणार आहे

Sonakshi Performance Curiosity | सोनाक्षीच्या परफॉर्मन्सची उत्सुकता

सोनाक्षीच्या परफॉर्मन्सची उत्सुकता


ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. लोकमतच्या सहकायार्ने होत असलेल्या या फेस्टिव्हलची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून सगळ्यांना लागली आहे. या फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आणि बॉलिवुडमधील अनेक जण परफॉर्मन्स सादर करणार आहेत. बॉलिवुडमधील कोणत्या अभिनेत्री, अभिनेते थिरकणार याची चांगलीच चर्चा सुरू आहे. बॉलिवुडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्मन्स सादर करणार आहे. सोनाक्षी या फेस्टिव्हलमध्ये एखाद्या गाण्यावर नृत्य सादर करणार की गाणे गाणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे.
सोनाक्षी ही चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका आहे आणि तिने हे नुकतेच अकिरा या चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे. तिने गायलेले रज रज के हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे आता सोनाक्षी ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल या फेस्टिव्हला गाणार की नृत्य करणार हे पाहाणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Sonakshi Performance Curiosity