सोहेल खान करणार कार्यक्रमाचे परीक्षण

By Admin | Updated: February 5, 2017 02:32 IST2017-02-05T02:32:28+5:302017-02-05T02:32:28+5:30

सोहेल खानने अनेक वर्षांपूर्वी ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते. या कार्यक्रमाच्या अनेक सिझनमध्ये आपल्याला तो परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता

Sohail Khan test program | सोहेल खान करणार कार्यक्रमाचे परीक्षण

सोहेल खान करणार कार्यक्रमाचे परीक्षण

सोहेल खानने अनेक वर्षांपूर्वी ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते. या कार्यक्रमाच्या अनेक सिझनमध्ये आपल्याला तो परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा तो परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे. तो आता छोटे मियाँ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. त्याने कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांच्या कॉमेडी अ‍ॅक्टवर भाष्य केले आहे. लहान मुलांना जज करण्यासाठी तो सध्या खूप उत्सुक आहे. छोटे मियाँ या कार्यक्रमात चार ते चौदा या वयोगटातील मुलांना त्यांचे विनोदकौशल्य सादर करण्याची संधी दिली जाते. सध्या या कार्यक्रमासाठी आॅडिशन्स सुरू असून देशभरातील विविध भागातील मुले आपली कला सादर करत आहेत. या कार्यक्रमात कोणाची निवड केली जावी आणि कोणाची नाही असे परीक्षकांना झाले आहे. कॉमेडीचा चांगली जाण असल्याने या कार्यक्रमासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात त्याच्यासोबत अभिनेत्री नेहा धुपियादेखील परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे.

Web Title: Sohail Khan test program