स्मिता दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत

By Admin | Updated: October 30, 2016 01:27 IST2016-10-30T01:27:40+5:302016-10-30T01:27:40+5:30

स्मिता तांबे नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. राष्ट्रीय पुरस्कारांवरदेखील स्मिताने आपली मोहोर उमटविली आहे. आता पुन्हा

Smita appears in the role of secretarial | स्मिता दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत

स्मिता दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत

- उडती खबर

स्मिता तांबे नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. राष्ट्रीय पुरस्कारांवरदेखील स्मिताने आपली मोहोर उमटविली आहे. आता पुन्हा ती एका आव्हानात्मक भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. लवकरच स्मिता एका आगामी मराठी चित्रपटात गुप्तहेर बनणार असल्याचे समजतेय. या चित्रपटासाठी स्मिता चांगलीच मेहनत घेत असून तिची जोरदार तयारी सुरू असल्यचेदेखील कळत आहे. स्मिताने नटरंग, गणवेश यांसारख्या अनेक चित्रपटांतून उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. स्त्रीप्रधान चित्रपटात आपल्याला नेहमीच स्मिता पाहायला मिळते. आता या गुप्तहेराच्या भूमिकेत ती नक्की दिसणार का, हे आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: Smita appears in the role of secretarial