"मी फक्त डायपर बदलतो..." बाबा झाल्यानंतर काय वाटतं? सिद्धार्थ म्हणाला "तो डोळे उघडणारा अनुभव...."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:06 IST2025-12-01T16:05:41+5:302025-12-01T16:06:54+5:30
सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीचे कौतुक केलं.

"मी फक्त डायपर बदलतो..." बाबा झाल्यानंतर काय वाटतं? सिद्धार्थ म्हणाला "तो डोळे उघडणारा अनुभव...."
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आयुष्यात यावर्षी गोड परी 'सारायाह'ची एण्ट्री झाली. कियारानं १५ जुलै रोजी मुलगी 'सारायाह' जन्म दिला. सिद्धार्थ व कियाराची मुलगी साडेचार महिन्यांची झाली आहे. तेव्हापासून या दोघांचे चाहते त्यांच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. पण कियारा आणि सिद्धार्थने सुद्धा इतर सेलिब्रिटींच्या उदाहरणाचे अनुकरण करून, त्यांच्या मुलीला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच 'वी द वीमेन' इव्हेंटमध्ये पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना सिद्धार्थनं मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला आणि कियाराचं भरभरून कौतुकही केलं.
सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीचे कौतुक केलं. सिद्धार्थ म्हणाला, "मी माझ्या मुलीला सुपरस्टार आणि माझ्या पत्नीला सुपरहिरो मानतो. आता ती खरी सुपरहिरो बनली आहे". तो पुढे म्हणाला, "गरोदरपणात आणि बाळंतपणात तिला पाहणे हा माझ्यासाठी डोळे उघडणारा अनुभव होता. पुरुष हे नेहमीच धैर्य आणि ताकदीबद्दल बोलतात, पण महिला जेव्हा आई होतात, तेव्हा त्या खऱ्या अर्थाने धैर्य आणि ताकद दाखवतात".
तो म्हणाला, "गरोदरपणात तिचे हार्मोनल आणि शारीरिक बदल मी जवळून पाहिले आहेत. आणि आता सारायाहची काळजी घेताना ती खरोखरची सुपरहिरो बनली आहे. माझं तर फक्त डायपर बदलणं, फोटो काढणं हेच योगदान आहे किंवा घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो", असे त्याने नम्रपणे सांगितले.
सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला मुलीच्या नावाचा अर्थ
यावेळी सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या मुलीच्या नावाचा खास अर्थ उघड केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले की, त्यांच्या मुलीचे नाव 'सारायाह' असून त्याचा एक खास अर्थ आहे. 'सारायाह' म्हणजे 'देवाची राजकुमारी' असा त्यानं सांगितलं. तो म्हणाला, "हे पूर्वेकडून आलेले एक अतिशय खास नाव आहे, जे प्रत्यक्षात एक हिब्रू नाव आहे". सिद्धार्थने खुलासा केला की, मुलीचे नाव जाहीर करायचे की नाही यावर त्यांनी सुरुवातीला विचार केला होता, पण नंतर ते जाहीर करण्याचा निर्णय घेतला.