सिद्धार्थ करतोय ‘पिंडदान’

By Admin | Updated: March 12, 2016 02:31 IST2016-03-12T02:31:59+5:302016-03-12T02:31:59+5:30

पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणारा आपला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आता पिंडदान करतोय हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना. पिंडदान हा शब्द ऐकूनच अंगावर शहारा येतो

Siddhartha is doing 'Pinddaan' | सिद्धार्थ करतोय ‘पिंडदान’

सिद्धार्थ करतोय ‘पिंडदान’

पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणारा आपला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर आता पिंडदान करतोय हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना. पिंडदान हा शब्द ऐकूनच अंगावर शहारा येतो, मग असे काय झालेय की सिद्धार्थ पिंडदान करतोय हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जरा थांबा. तो पिंडदान नावाचा सिनेमा घेऊन लवकरच त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नावावरून सिनेमाचा विषय जरी गंभीर वाटत असेल तरी ही एक लव स्टोरी असल्याचे सिद्धार्थने सीएनएक्सला दिलेल्या एका इंटरव्ह्युमध्ये सांगितले आहे. सिद्धार्थ म्हणतोय, पिंडदान ही अतिशय वेगळी प्रेमकहाणी आहे. मनवा नाईकसोबत प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत असल्याने खूप एक्साइटमेंट आहे. मनवा एक उत्तम डायरेक्टर आणि अ‍ॅक्टर आहे. सेटवर काम करताना आम्हाला खूपच मजा आली. चित्रपटाच्या कथेविषयी तो सांगतोय की, आम्ही लंडनमध्ये राहत असतो आणि पिंडदान नावाच्या एका डॉक्युमेंट्रीसाठी दोघेही भारतात येतो. आणि मग कथेला पुढे सुरुवात होते. सिद्धार्थने कथेविषयी सस्पेन्स ठेवला असल्याने त्याच्या चाहत्यांची आता पिंडदान विषयी नक्कीच क्युरियासिटी वाढली असणार.

Web Title: Siddhartha is doing 'Pinddaan'