सिद्धार्थ-कियाराने दाखवला 'बेबी गर्ल'चा चेहरा? सलमान खानसोबतचा सेल्फी फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:22 IST2025-07-19T16:21:40+5:302025-07-19T16:22:05+5:30
सिद्धार्थ-कियारा नुकतेच आई-बाबा झाले असून त्यांच्या लेकीचा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या

सिद्धार्थ-कियाराने दाखवला 'बेबी गर्ल'चा चेहरा? सलमान खानसोबतचा सेल्फी फोटो व्हायरल
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे काहीच दिवसांपूर्वी आई-बाबा झाले. सिद्धार्थ-कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे. दोघांच्या चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सिद्धार्थ - कियाराने मुलीचा जन्म झाल्यानंतर फोटो काढू नका फक्त आशीर्वाद द्या, अशी विनंती पापाराझींना केली होती. यानंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या बेबी गर्लचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत सलमान खानही दिसून येतेय. पण प्रकरण काहीतरी वेगळंच आहे.
सिद्धार्थ- कियाराच्या बेबी गर्लचा व्हायरल फोटो
झालंय असं की, सोशल मीडियावर सिद्धार्थ-कियाराच्या बेबी गर्लचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोत सलमान खानही दिसत असून सिद्धार्थ-कियाराची लहान मुलगी दिसत आहे. अनेकांना ही गोंडस मुलगी सिद्धार्थ - कियाराचीच वाटली असून त्यांनी या फोटोवर लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय. परंतु हा फोटो खरा नाही हे काहीच तासांनंतर उघड झालंय. हा फोटो संपूर्णतः फेक आणि एडिट केलेला आहे. हा फोटो अत्यंत हुशारीने एडिट केला असून त्यांच्यासोबत असलेलं लहान बाळ या फोटोमध्ये जोडलं गेलं आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडवर नजर मारली तर ते सुद्धा खरं नाहीये. हे सत्य कळताच लोकांनी राग व्यक्त केलाय.
सिद्धार्थ-कियाराने चाहत्यांना केली विनंती
लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्राने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो,"तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. आमचं मन आनंदाने भरुन आलं आहे. आयुष्यात पालकत्व अनुभवण्याचा हा नवीन प्रवास सुरु करताना आम्हाला कुटुंब म्हणून प्रायव्हसी द्याल अशी आशा. हा खास काळ प्रायव्हेट राहिला तर आम्हाला खूप बरं वाटेल. त्यामुळे, नो फोटो प्लीज, फक्त आशीर्वाद द्या. धन्यवाद.- कियारा आणि सिद्धार्थ." हे दोघं त्यांच्या मुलीची झलक कधी दाखवणार याची सर्वांना उत्सुकता आहे.