सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:09 IST2025-07-21T09:08:22+5:302025-07-21T09:09:06+5:30

कियारा अडवाणीने १५ जुलै रोजी मुलीला जन्म दिला.

siddharth malhotra and kiara advani s daughter grand welcome at home see glimpses | सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांना कन्यारत्न प्राप्त झालं. घरी लक्ष्मी आल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी कियाराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. लाडक्या लेकीचं घरी जंगी स्वागत करण्यात आलं. याचीच झलक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये लेकीची झलक दिसत नाही. सिद्धार्थ आणि कियाराने सध्या पापाराझींना नो फोटो प्लीज अशी विनंती केली आहे. 

कियारा अडवाणीने १५ जुलै रोजी मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर पोस्ट करत गुडन्यूज दिली. दोघांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच सिद्धार्थनेही पापाराझींना फोटो न घेण्याची विनंती केली. त्यामुळे आता छोट्या कियाराचा चेहरा इतक्यात तरी चाहत्यांना बघता येणार नाही. कियाराला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. घरातील सर्व सदस्यांनी चिमुकलीचं थाटामाटात स्वागत केलं. सिड-कियाराच्या फॅन पेजेसवर या सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळाली. युनिकॉर्न बलून, गुलाबी हिंडोला आणि इतर आकर्षक खेळण्यांसह घर सजवलेलं दिसत आहे. 'आमच्या चिमुकल्या राजकुमारीचं या जगात स्वागत आहे. तुझ्या येण्याने आम्ही पुन्हा आयुष्यावर प्रेम करत आहोत. या अनमोल भेटीसाठी सिद्धार्थ-कियाराचे आभार. तुम्हाला खूप प्रेम."

वर्कफ्रंट

सिद्धार्थ मल्होत्रा आगामी 'परम सुंदरी' सिनेमात दिसणार आहे. तर कियाराचा 'वॉर २' रिलीज होणार आहे. तसंच ती रणवीर सिंहसोबत 'डॉन ३'मध्येही दिसणार असल्याची चर्चा  होती. लेकीच्या जन्मानंतर कियारा आता कधी काम सुरु करणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. सध्या दोघंही नव्याने पालक झाल्याचा आनंद घेत आहेत. 

Web Title: siddharth malhotra and kiara advani s daughter grand welcome at home see glimpses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.