नटीनं मारली मिठी...! मुंबई इंडियन्सने IPL प्लेऑफ्समध्ये प्रवेश करताच सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:08 IST2025-05-22T10:07:41+5:302025-05-22T10:08:14+5:30
IPL 2025 मध्ये काल मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने दिल्लीला हरवलं आणि प्लेऑफ्समध्ये दिमाखात प्रवेश केला. त्यामुळे सिद्धार्थ जाधवने वानखेडेवर जोरदार सेलिब्रेशन केलं

नटीनं मारली मिठी...! मुंबई इंडियन्सने IPL प्लेऑफ्समध्ये प्रवेश करताच सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
काल मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवून IPL प्लेऑफ्समध्ये दिमाखात एन्ट्री घेतली. सुरुवातीला हा सामना अटीतटीचा वाटत होता. परंतु मुंबई इंडियन्सचे गोलंदाज रिकल्टन आणि बुमराहने दिल्लीच्या सर्व फलंदाजांना ऑल आऊट करत प्लेऑफ्समध्ये दिमाखात प्रवेश केला. यावेळी IPL सामना पाहायला मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने (siddharth jadhav) वानखेडेवर जोरदार सेलिब्रेशन केलं. याशिवाय ट्रे़डींग गाण्यावर खान्स डान्सही केला.
सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन
अभिनेता सिद्धार्थ जाधव मुंबई इंडियन्सचे सामने पाहायला वानखेडेवर हजेरी लावताना दिसतो. सिद्धार्थ कालची मुंबई VS दिल्लीची मॅच बघायला वानखेडेवर उपस्थित होता. त्यावेळी सिद्धार्थने मराठी इन्ल्फ्लुएन्सरसोबत 'नटीनं मारली मिठी' या ट्रेडींग गाण्यावर डान्स केला. सिद्धार्थची तुफान एनर्जी यावेळी बघायला मिळाली. मुंबई इंडियन्स प्लेऑफ्समध्ये गेल्याने सिद्धार्थ चांगलाच आनंदी झालेला दिसतोय. मुंबई इंडियन्सच्या ऑफिशिअल पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. अल्पावधीतच सिद्धूचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा प्लेऑफ्समध्ये दिमाखात प्रवेश
वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिमाखदार विजय नोंदवत प्लेऑफ्समधील आपले स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकासह नमन धीरनं केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने २० षटकात ५ बाद १८० धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर १८१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२१ धावांत ऑल आउट झाला.