श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:46 IST2025-05-12T18:45:37+5:302025-05-12T18:46:09+5:30

"विराट कोहलीसोबत शूट करताना...", काय म्हणाली श्रुती मराठे?

Shruti Marathe worked with Virat Kohli in an advertisement shares her experience | श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) आजच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी भावुक झाले आहेत. मराठी अभिनेत्री श्रुती मराठेला (Shruti Marathe) काही दिवसांपूर्वीच विराटसोबत जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. याचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला. 

'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत श्रुती म्हणाली, "विराट कोहलीसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा आणि पटापट शूट करुन त्यांना जाऊ द्या असं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तो खूप चिल्ड आऊट होता. कृणाल पांड्या आणि विराट दोघंही होते. दोघंही इतके टाईमपास गप्पा मारत होते. म्हणजे एक वेळ तर अशीही होती की ते चक्क मीम्सवरही चर्चा करत होते.  मला असं वाटलं की अरे सोशल मीडियावर काय चालू आहे, कोणतं मीम मजेशीर आहे कोणतं व्हायरल झालं आहे यावर त्यांचं पण लक्ष असतं. हे बघून मला आश्चर्यच वाटलं. 

मी क्रिकेट बघते

श्रुती पुढे म्हणाली, "ऑन कॅमेरा बरेच रिटेक्स झाले. जाहिरात शूट करताना वेगवेगळ्या अँगलने शूट होत असतं त्यामुळे बऱ्याचदा रिटेक झाले. पण ते कोणीच कंटाळले नाहीत. इतक्या जाहिराती ते करत असतात त्यामुळे ते त्यात आता तरबेज झालेत. जेव्हा मला कळलं की विराट कोहलीसोबत जाहिरात आहे तेव्हा मला उलट याचं टेन्शन आलं होतं की आपल्याला काही काम असेल की नाही. मी स्वत: क्रिकेटप्रेमी आहे. भारत विरुद्ध दुसऱ्या देशाचा सामना असेल तेव्हा मी तो बघतेच."

Web Title: Shruti Marathe worked with Virat Kohli in an advertisement shares her experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.