"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:13 IST2025-11-21T11:12:45+5:302025-11-21T11:13:15+5:30
मी घरातच होतो, बाहेर काय घडतंय हे..., शिव ठाकरेने सांगितली संपूर्ण घटना

"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
'बिग बॉस मराठी'विजेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घरी दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत लिव्हिंग रुम जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे अधिकारी त्याच्या घरी दाखल झाले तेव्हाची काय परिस्थिती होती याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिव ठाकरे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला. मात्र त्याचं बरंच नुकसान झालं. दोन वर्षांपूर्वीच त्याचं मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं मात्र आज त्याच्यावर ही परिस्थिती ओढवली. आता नुकतंच त्याने या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
शिव ठाकरेच्या घरी आग लागली आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं शिवने नंतर सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत सांगितलं. आता त्याने व्हिरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण घटना सांगितली. तो म्हणाला, "आग लागली तेव्हा मी घरातच होतो. सकाळी ही दुर्घटना घडली. मी तेव्हा झोपलो होतो. अख्खं घर जळत होतं आणि मला काहीच कळालं नाही. कारण बाहेरुन काहीच आवाज येत नव्हते. ना सायरनचा आवाज ना अजून काही. आम्ही मोठमोठ्या इमारतीत राहतो ते फक्त नावालाच असतं. देवाच्या कृपेनेच आज मी इथे आहे. माझ्या घरी काम करणारी देव बनूनच आली. तिने दार ठोठावलं. मी बाहेर येऊन पाहिलं तर रात्रीसारखा अंधार झाला होता. असं समजा की देवाच्या कृपेनेच मी वाचलो."
तो पुढे म्हणाला, "नुकसान तर झालं..पण काय करणार पुन्हा कमवता येईल. देव सोबतच आहेच अजून काम करु आणि कमवू. २ सेकंदासाठी वाईट वाटतं की अरे या गोष्टी खूप मेहनतीने कमावल्या आहेत. सर्वात जास्त वाईट वाटतं जेव्हा ट्रॉफी जळाल्या. मला वाटतं बाकी पैसे तर मी कमवेन पण ट्रॉफी आणि अशा गोष्टी आहेत ज्या मला मिळाल्या, जी शाबासकी आहे ती जळताना पाहून मला जास्त दु:ख झालं."