आता आठवणी राहतील कायम जिवंत! शिव ठाकरेने आजीसाठी जे केलं ते पाहून डोळे भरून येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:26 IST2025-12-26T15:25:23+5:302025-12-26T15:26:12+5:30

शिव ठाकरेनं ख्रिसमसला आजीसाठी केलं असं काही.., नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Shiv Thakare Grandmother Hand And Foot Impressions 3d Casting See Video | आता आठवणी राहतील कायम जिवंत! शिव ठाकरेने आजीसाठी जे केलं ते पाहून डोळे भरून येतील

आता आठवणी राहतील कायम जिवंत! शिव ठाकरेने आजीसाठी जे केलं ते पाहून डोळे भरून येतील

आजी म्हणजे काय तर दूधावरची साय... आजी ही आजीच असते. मग ती कोणा सर्वसामान्यांची असो किंवा कोणा सेलिब्रेटींची. आजीचा मायेचा एक हात मनाला शांत करण्यास पुरेसा असतो. सध्याच्या काळातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला शिव ठाकरेचंही आपल्या आजीवर प्रचंड प्रेम आहे. अभिनेता शिव ठाकरेने आपल्या लाडक्या आजीच्या आठवणींना चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी एका अनोख्या कलेचा आधार घेतला आहे, ती कला म्हणजे '३डी कास्टिंग'.  शिवने आपल्या आजीच्या हातांचे आणि पायांचे हुबेहूब ३डी ठसे बनवून घेतले आहेत.

'३डी कास्टिंग' ही कला प्रचंड लोकप्रिय होत आहे. शिव ठाकरे याने देखील याच कलेचा आधार घेत आपल्या लाडक्या आजीच्या आठवणींंना आता मूर्त रूप दिलंय. शिवने आपल्या आजीच्या हातांचे आणि पायांचे हुबेहूब ३डी ठसे बनवून घेतले आहेत. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  "माझा सांता क्लॉज... माझी आजी" असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं. हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत, कारण यामध्ये त्याच्या आजीच्या हातावरील, पायांवरील त्या सुरकुत्या आणि रेषा देखील स्पष्टपणे दिसत आहेत. शिवच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होत आहे.


शिव ठाकरे आपल्या कुटुंबाच्या आणि विशेषतः आपल्या आजीच्या किती जवळ आहे, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. आजीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा आणि तिचे अस्तित्व सदैव आपल्यासोबत राहावे, या हेतूने हे ३डी कास्टिंग करून घेतले आहे. मुळचा अमरावतीचा असलेल्या शिव ठाकरेचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. 'मराठी बिग बॉस' जिंकल्यानंतर शिव ठाकरेने 'हिंदी बिग बॉस'चा सीझन १६ही गाजवला. या शोचा तो उपविजेता ठरला. आपल्या साधेपणामुळे कायम चाहत्यांचं लक्ष वेधणारा शिव ठाकरे टिव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 
 

 

Web Title : शिव ठाकरे ने 3डी कास्टिंग से दादी की यादों को अमर किया, प्रशंसक भावुक।

Web Summary : शिव ठाकरे ने अपनी दादी के हाथों और पैरों की 3डी कास्टिंग के माध्यम से उनकी यादों को संजोया। उन्होंने इंस्टाग्राम पर वीडियो साझा करते हुए इसे 'माई सांता क्लॉज़... माई ग्रांमा' कैप्शन दिया। प्रशंसक इस भाव से अभिभूत हैं, और अपनी दादी के प्रति उनके प्यार की प्रशंसा कर रहे हैं।

Web Title : Shiv Thakare immortalizes grandmother's memories with 3D casting, fans emotional.

Web Summary : Shiv Thakare preserved his grandmother's memories through 3D casting of her hands and feet. He shared the video on Instagram, captioning it 'My Santa Claus... My Grandma.' Fans are touched by this gesture, praising his love for his grandmother.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.