शायनी अहुजाने पाठवली एकता कपूरला नोटीस

By Admin | Updated: July 15, 2016 14:23 IST2016-07-15T14:23:22+5:302016-07-15T14:23:22+5:30

बालाजी मोशन पिक्चर्स आणि मारुती इंटरनॅशनल निर्मित 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटात आपल्या नावाचा वापर केल्याने अभिनेता शायनी अहुजाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे

Shiney Ahuja sent notice to Ekta Kapoor | शायनी अहुजाने पाठवली एकता कपूरला नोटीस

शायनी अहुजाने पाठवली एकता कपूरला नोटीस

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 15 - बालाजी मोशन पिक्चर्स आणि मारुती इंटरनॅशनल निर्मित 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटात आपल्या नावाचा वापर केल्याने अभिनेता शायनी अहुजाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपटात मोलकरणीच्या पात्राला शायनी नाव देण्यात आल्याने शायनी अहुजाने नाराजी व्यक्त केली आहे. 
 
एकता कपूर, जितेंद्र,  इंद्रकुमार यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आपलं नाव वापरण्यात आलेली दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावीत तसंच आपली माफी मागावी अशी मागणी शायनी अहुजाने केली आहे.  शायनी अहुजाला मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2011 मध्ये न्यायालयाने त्याला 7 वर्षांची शिक्षादेखील सुनावली होती. 
 

Web Title: Shiney Ahuja sent notice to Ekta Kapoor