शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट(फोटो स्टोरी)
By Admin | Updated: April 14, 2017 18:14 IST2017-04-14T18:09:23+5:302017-04-14T18:14:38+5:30
काही वर्षांपूर्वी आयपीएलची होस्ट म्हणून प्रसिद्ध झालेली मराठी मुलगी शिबानी दांडेकरने नुकतेच हॉट फोटोशूट केले आहे

शिबानी दांडेकरचे हॉट फोटोशूट(फोटो स्टोरी)
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - काही वर्षांपूर्वी आयपीएलची होस्ट म्हणून प्रसिद्ध झालेली मराठी मुलगी शिबानी दांडेकरने नुकतेच हॉट फोटोशूट केले आहे. मॅक्सीम या मॅगझिनसाठी केलेल्या हॉट फोटोशूटमुळे शिबानी चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर तिने शेअर केलेले फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिबानी दांडेकर सध्या नूर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत सोनाक्षी सिन्हा आहे.
शिबानीचा जन्म ऑगस्ट 1981 मध्ये पुण्यात झाला होता, पण ती लहानाची मोठी झाली ऑस्ट्रेलियात. अभिनेत्री, गायिका, मॉडेल आणि अँकर अशी मल्टीटॅलेंटेड आहे. बॉलीवीड अॅक्ट्रेस अनुषा आणि अपेक्षा दांडेकर या बहिणींसह तिने डी-मेजर नावाचा म्युझिक बँडही तयार केला आहे. 2014 मध्ये टाइमपास या मराठी चित्रपटातील शबानाचे आयटम साँग चर्चेत राहिले होते. यापूर्वी GQ सह अनेक मॅगझिनसाठी तिने फोटोशूट केले आहे.