रेखासोबत इंंटिमेट सीनच्या शूटींगवेळी शेखर सुमनचा अनुभव कसा होता? म्हणाला, "स्पर्श करताना त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:03 PM2024-04-24T16:03:32+5:302024-04-24T16:04:03+5:30

शेखर सुमन यांनी उत्सव सिनेमात रेखासोबत असलेल्या इंटिमेट सीनचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाले शेखर बघा. (shekhar suman, rekha, utsav)

Shekhar Suman experience while shooting an intimate scene with Rekha in utsav movie | रेखासोबत इंंटिमेट सीनच्या शूटींगवेळी शेखर सुमनचा अनुभव कसा होता? म्हणाला, "स्पर्श करताना त्यांनी..."

रेखासोबत इंंटिमेट सीनच्या शूटींगवेळी शेखर सुमनचा अनुभव कसा होता? म्हणाला, "स्पर्श करताना त्यांनी..."

सध्या संजय लीला भन्सालींच्या 'हिरामंडी' वेबसिरीजची सर्वांना उत्सुकता आहे. 'हिरामंडी' सिरीजच्या निमित्ताने अनेक वर्षांनी शेखर सुमन यांचा अभिनय बघायला मिळणार आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशननिमित्ताने शेखर सुमन अनेक ठिकाणी त्यांंचं मत व्यक्त करत आहेत. अशातच शेखर यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखासोबतचा इंटिमेट सीनचा  भन्नाट अनुभव सांगितला आहे. 

शेखर सुमन म्हणतात, "उत्सव सिनेमाच्या शूटींगवेळी मला रेखा यांच्या कामाच्या बाबतीत प्रोफेशनल वागण्याचा चांगलाच अनुभव मिळाला. आमच्या सिनेमातील एका इंटिमेट सीनचं शूटींग सुरु होतं. तेव्हा रेखा यांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली. दुसरी कोणी अभिनेत्री असती तर सामान पॅक करुन ती घरी गेली असती. पण रेखा यांनी माझा विचार केला. मी त्यावेळी नवखा होता. रेखा या त्यावेळी रेडनिमित्त घरी गेल्या असत्या तर आमचं शूटींग रद्द होईल याची त्यांना जाणीव होती."

शेखर पुढे म्हणाले, "जर शूटींग रद्द झालं असतं तर इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होण्याच्या माझ्या स्वप्नावर पाणी पडलं असतं. पण रेखा थांबल्या आणि शूटींग पूर्ण केलं. याशिवाय इंटिमेट सीनचं शूटींग करताना त्यांनी मला खूप कंफर्टेबल केलं. याशिवाय मी नवखा असूनही इंटिमेट सीनवेळी स्पर्श करताना त्यांनी कोणतीही आडकाठी केली नाही. शूटींगचा भाग असल्याने रेखा यांनी इंटिमेट सीन करताना मला मोकळीक दिली. मी आयुष्यभर त्यांचा ऋणी असेल." शेखर  'हिरामंडी' वेबसिरीजमध्ये झळकणार असून १ मे २०२४ ला ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Web Title: Shekhar Suman experience while shooting an intimate scene with Rekha in utsav movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.