फरहान अख्तरच्या घरातून श्रद्धाला शक्ती कपूरने नेले फरफटत

By Admin | Published: December 29, 2016 03:55 PM2016-12-29T15:55:45+5:302016-12-30T19:33:01+5:30

रॉक ऑन २ चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरमधली प्रेमकहाणी सध्या भलतीच रंगात आली आहे.

Shakir Kapoor took the blessings from the house of Farhan Akhtar | फरहान अख्तरच्या घरातून श्रद्धाला शक्ती कपूरने नेले फरफटत

फरहान अख्तरच्या घरातून श्रद्धाला शक्ती कपूरने नेले फरफटत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - रॉक ऑन २ चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरमधली प्रेमकहाणी सध्या भलतीच रंगात आली आहे. प्रेमात आंधळी झालेली श्रद्धा वडिलांचं घर सोडून फरहान अख्तरसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. मात्र फरहान आणि श्रद्धाच्या प्रेम कहाणीत तिचे वडील शक्ती कपूर हे व्हिलन ठरले आहेत.

दरम्यान, फरहान राहत असलेल्या घराच्या दरवाजाची रविवारी जेव्हा बेल वाजली आणि श्रद्धाने दरवाजा उघडला. तेव्हा समोरील व्यक्ती पाहून ती घाबरली. दरवाज्याच्या पलिकडे दुसरे तिसरे कोणी नाही तर शक्ती कपूर आणि मावशी पद्मिनी कोल्हापुरे (शक्तीच्या पत्नीची बहीण) तिला घरी नेण्यासाठी आले होते. विवाहित आणि दोन मुलांचा बाप असणाऱ्या फरहानसोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध शक्तीला मान्य नव्हते. त्यावेळी शक्ती कपूर, फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. श्रद्धा सहजासहजी घरी जाण्यास तयार नव्हती. अखेर शक्ती कपूरनं तिला फरफटत घरी नेले. मीडियाला गॉसिप नको म्हणून श्रद्धा गुपचूप गाडीत बसली. तिच्या लव्हस्टोरीत असादेखील प्रसंग येईल याची पुसटशीही कल्पना तिने केली नसावी. या सर्व प्रकरणावर अद्याप फरहानची प्रतिक्रिया मिळाली नाही.

(वडील शक्ती कपूर रिअल लाइफमध्येही फूल धम्माल आहेत - श्रद्धा कपूर)

दोघांची घनिष्ठ मैत्री पाहूनच त्याची पत्नी अधुनाने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असून, ते वेगळे राहतात. श्रद्धाच्या घरच्यांना सुद्धा या दोघांचे नातेसंबंध मान्य नाहीत. दोघांच्या वयातही खूप अंतर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे राहत असलेल्या इमारतीमध्ये दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगू लागल्या होत्या. फरहान या नात्याला नवं नाव देण्याच्या तयारीत होता. मात्र आता या प्रेम कहाणीत मोठ्या पडद्यावर खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले श्रद्धाचे वडील शक्ती कपूर तिच्या आयुष्यातील व्हिलन ठरले आहेत.

Web Title: Shakir Kapoor took the blessings from the house of Farhan Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.