शाहरुखची मुलगी सुहानाचा व्हिडीओ व्हायरल

By Admin | Updated: February 9, 2017 16:21 IST2017-02-09T15:50:12+5:302017-02-09T16:21:53+5:30

सुहानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shahrukh's daughter, Mehrun's video viral | शाहरुखची मुलगी सुहानाचा व्हिडीओ व्हायरल

शाहरुखची मुलगी सुहानाचा व्हिडीओ व्हायरल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - बॉलिवूडमध्ये गॉडफादर असणे हे अभिनेता बनण्याचा एकमेव मार्ग नसून त्यासाठी मुळात अभिनय कौशल्य असणं गरजेचं असतं. त्यासाठी इच्छा असणंदेखील गरजेचं असतं. आता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाबद्दलच पाहायचं गेलं तर तिने सुरुवातीपासूनच बॉलिवूडपासून अंतर ठेवलं आहे. अभिनेत्री होणं तिच्यासाठी फार काही अवघड नव्हतं. पण शाहरुखची मुलगी सुहानाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. 
 
सुहानाने सुरुवातीपासूनच आपली अभिनेत्री होण्याची इच्छा मोकळेपणाने व्यक्त केली आहे. शाहरुखलाही आपल्या मुलीच्या इच्छेबद्दल माहिती आहे. अनेकदा मुलाखतीत शाहरुखने हे बोलून दाखवलं आहे. 'सुहाना अनेक नाटकांमध्ये भाग घेत असते, आणि ती एक चांगली अभिनेत्री आहे. फक्त तुमचे आई - वडिल अभिनय करतात म्हणून तुम्हाला अभिनय करावसं वाटणं चुकीचं आहे, तुम्ही त्याशिवाय दुसरं काहीच करु शकत नाही म्हणून अभिनय केला पाहिजे', असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 
 
सुहानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुहाना एका नाटकात अभिनय करताना दिसत आहे. या नाटकात ती एका अनाथ मुलीचा अभिनय करत आहे. तिचा अभिनय आणि आत्मविश्वास पाहता सुहाना बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. 
 

Web Title: Shahrukh's daughter, Mehrun's video viral