सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलने तोडली चुप्पी; म्हणाली - 'तो परत आलाय, फक्त त्याचा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:25 PM2022-01-05T17:25:57+5:302022-01-05T17:26:35+5:30

बिग बॉस १३ (Bigg Boss 13)चा विजेता सिद्धार्थ शुक्ला(Siddharth Shukla)च्या निधनानंतर त्याची खास मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill)कोलमडून गेली होती, मात्र आता हळूहळू ती त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Shahnaz Gill breaks silence after Siddharth Shukla's death; Said - 'He's back, only his ...' | सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलने तोडली चुप्पी; म्हणाली - 'तो परत आलाय, फक्त त्याचा...'

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलने तोडली चुप्पी; म्हणाली - 'तो परत आलाय, फक्त त्याचा...'

googlenewsNext

बिग बॉस १३ (Bigg Boss 13)चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)च्या निधनानंतर  त्याची खास मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill) कोलमडून गेली होती, मात्र आता हळूहळू ती त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या पाच महिन्यांनंतर शहनाज गिल पहिल्यांदाच उघडपणे बोलली आहे. शहनाज गिल आणि आध्यात्मिक गुरू बीके शिवानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज गिल आध्यात्मिकरित्या बोलताना दिसत आहे.

शहनाज गिलने तिच्या यूट्यूब चॅनलवर सुमारे एक तासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज बीके शिवानीशी बोलताना म्हणाली, 'मी सिद्धार्थ शुक्लाला अनेकदा सांगायचे की मला ब्रह्माकुमारी बीके शिवानी यांना भेटायचे आहे. मला त्या खूप आवडतात. मग तो नेहमी म्हणायचा, एक दिवस नक्की भेटू, शांत होऊ आणि तसंच झालं. तुम्हाला भेटण्याचा माझा नेहमीच हेतू होता आणि तो कसा तरी तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, म्हणून मग आम्ही सहभागी झालो.


सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून देताना शहनाज म्हणाली, 'मी अनेकदा विचार करते की त्या आत्म्याने मला इतके ज्ञान कसे दिले. मी पूर्वी लोकांचे विश्लेषण करू शकत नव्हते. त्यावेळी मी खरेच निरागस होते, पण त्या आत्म्याने मला आयुष्यात खूप काही शिकवले. देवाने माझी त्या आत्म्याशी ओळख करून दिली आणि आम्हाला मित्र म्हणून एकत्र ठेवले जेणेकरून तो मला आयुष्यात काहीतरी शिकवू शकेल.
शहनाज गिल म्हणाली, गेल्या दीड वर्षात मी खूप काही शिकले आहे. माझा मार्ग देवाकडे घेऊन जाणार होता आणि कदाचित म्हणूनच तो आत्मा माझ्या आयुष्यात आला. त्याने मला खूप काही शिकवले. त्याने माझी तुमच्यासारख्या लोकांशी ओळख करून दिली. आता मी सर्वकाही खंबीरपणे हाताळू शकते, मी आता खूप मजबूत आहे.
शहनाज गिल पुढे म्हणते, आमचा प्रवास अजूनही सुरू आहे, तिचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्याचे कपडे बदलले आहेत, पण तो कुठेतरी आला आहे. त्याचा चेहरा बदलला आहे, पण तो पुन्हा या रूपात आला आहे. त्याचे खाते माझ्याकडे सध्या बंद झाले आहे, नंतर कदाचित ते पुन्हा सुरू होईल.

Web Title: Shahnaz Gill breaks silence after Siddharth Shukla's death; Said - 'He's back, only his ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.