शाहीद-करिना एकाच छताखाली झाले स्पॉट!

By Admin | Updated: June 5, 2017 02:34 IST2017-06-05T02:34:12+5:302017-06-05T02:34:12+5:30

गेल्या आठवड्यात अभिनेता शाहीद कपूर आणि करिना कपूर खान हे एकाच ठिकाणी जीमसाठी येत असल्याचे काही फोटोज समोर आले होते.

Shahid-Karina came under the same roof! | शाहीद-करिना एकाच छताखाली झाले स्पॉट!

शाहीद-करिना एकाच छताखाली झाले स्पॉट!

गेल्या आठवड्यात अभिनेता शाहीद कपूर आणि करिना कपूर खान हे एकाच ठिकाणी जीमसाठी येत असल्याचे काही फोटोज समोर आले होते. जेव्हा मीडियामध्ये हे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा हे दोघेही चुपचाप जीम बदलतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु असे काहीही घडले नसून, अजूनही हे दोघे एकाच ठिकाणी जीमसाठी येत आहेत. उलट शाहिद पत्नी मीरा राजपूत हिलाही याच ठिकाणी जीमसाठी घेऊन येत आहे. याबाबतचे काही फोटो समोर आले असून, त्यांच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. शाहीद आणि मीराला जिममधून आपल्या कारमधून बाहेर पडताना बघण्यात आले होते. जेव्हा हे दोघे जीमच्या ठिकाणी पोहोचले त्याच्या काही वेळानंतरच करिनाही याठिकाणी पोहोचली. मात्र यावेळी तिच्यासोबत तिची जीम पार्टनर अमृता अरोरा बघावयास मिळाली नाही. करिना एकटीच या ठिकाणी पाहोचली होती. यावेळी करिनाने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि जेगिंग घातले होते. तर शाहिद काळ्या रंगाच्या जॉगर पँट आणि ग्रे टी-शर्टवर बघावयास मिळाला. वास्तविक शाहीद कपूर नेहमीच जीमविषयी अधिक जागरूक राहिला आहे, तर मीरा आणि करिनाने प्रेग्नंसीनंतर जीम जाण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Shahid-Karina came under the same roof!