तुम हुस्न परी तुम जाने जहाँ... अभिनेत्री माहिरा खानचे भुरळ पाडणारे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:26 PM2024-05-02T16:26:28+5:302024-05-02T16:35:25+5:30

अभिनेत्री माहिरा खानचे फक्त पाकिस्तानात नाही, तर भारतातही जबरदस्त फॅन फॉलोवर्स आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

माहिरा खान सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा असते.

अलिकडेच ती दुबईमधील EMI GALA पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. या सोहळ्यातील काही फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

माहिरा खान हिनं प्रसिद्ध डिझायनर मायकल सिन्कोच्या कलेक्शनमधील गाऊन परिधान केला होता.

आइस ब्लू रंगाचा हा गाऊन माहिरावर खूप खुलून दिसत होता. परफेक्ट मेकअप आणि ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला.

अभिनेत्री माहिरा खान या गाऊनमध्ये अगदी 'डिस्ने प्रिन्सेस' वाटत आहे. माहिरा खानने आपल्या कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.

माहिरा खानचे फोटो सोशल मीडियावर इतके व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.

माहिरा खान 2017 मध्ये शाहरुख खानसोबत रईस या चित्रपटात दिसली होती. शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणे हे माहिरा खानसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.

माहिराने व्हीजे म्हणून करिअरची सुरुवात एमटीव्ही पाकिस्तानबरोबर केली होती. 2011 मध्ये बोल या पाकिस्तानी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फवाद खानसोबतच्या 'हमसफर' या टीव्ही शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

पाकिस्तानची ही सुंदर अभिनेत्री आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ती चर्चेत असते.