लिपलॉक सीननंतर शबाना आझमी यांनी शेअर केला धर्मेंद्र यांच्यासोबतचा तो फोटो, म्हणाल्या-

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:17 PM2023-08-12T15:17:54+5:302023-08-12T15:39:06+5:30

धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील लिपलॉक सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे. याचदरम्यान शबाना आझमी यांनी एक फोटो शेअर केला आहे.

Shabana azmi shares throwback photo with dharmendra amid lip kiss scene | लिपलॉक सीननंतर शबाना आझमी यांनी शेअर केला धर्मेंद्र यांच्यासोबतचा तो फोटो, म्हणाल्या-

लिपलॉक सीननंतर शबाना आझमी यांनी शेअर केला धर्मेंद्र यांच्यासोबतचा तो फोटो, म्हणाल्या-

googlenewsNext

काही दिवसांपूर्वीच करण जोहरचा रॉकी आणि रानी की प्रेमकहाणी हा बहुचर्चित ठरलेला सिनेमा रिलीज झाला. रणवीर सिंग (ranveer singh) आणि आलिया भट्ट (alia bhatt)  यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. या सिनेमातील धर्मेंद्र (dharmendra) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या सीनवर व्यक्त होत आहेत. दरम्यान, शबाना आझमी यांनी धर्मेंद्रसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जो चर्चेत आला आहे.


रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २८ जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकारही दिसले आहेत. या चित्रपटातील दोघांच्या लिपलॉप सीनची खूप चर्चा झाली होती. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी यापूर्वीही चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

 शबाना आझमी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्या धर्मेंद्र यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोसोबत लिहिले आहे की, 'त्यावेळीच्या रॉकी आणि रानी जामिनी आणि कंवलजी यांना भेटले असावेत. हा फोटो 'मर्दों वाली बात' चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी एकत्र काम केले होते. चाहत्यांना शबाना आझमी यांनी शेअर केलेला हा फोटो खूप आवडला असून त्यावर कमेंट्स केल्या आहेत.. या चित्रपटाने दोन आठवड्यांत 120.78 कोटींची कमाई केली आहे.
 

Web Title: Shabana azmi shares throwback photo with dharmendra amid lip kiss scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.