सात नामांकने ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ला

By Admin | Updated: April 8, 2016 01:54 IST2016-04-08T01:54:14+5:302016-04-08T01:54:14+5:30

नितीन चव्हाण व योगेश जाधव लिखित-दिग्दर्शित दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटाला नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक नाही

The seven nominees called 'Damaged Babaik Story' | सात नामांकने ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ला

सात नामांकने ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ला

नितीन चव्हाण व योगेश जाधव लिखित-दिग्दर्शित दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटाला नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल सात नामांकने मिळाली आहेत. एका बापाची आणि त्याच्या मुलीची हृदयस्पर्शी कहाणी प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक संदेश अशा विभागांमध्ये दमलेल्या बाबाची कहाणीला ही नामांकने मिळाली आहेत. दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटात किशोर चौगुले, गीतकार-अभिनेते संदीप खरे, संस्कृती बालगुडे, ज्योती चांदेकर, आस्ताद काळे, दीप्ती भागवत, प्रवीण तरडे आदी कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: The seven nominees called 'Damaged Babaik Story'