'समसारा'चा चित्तथरारक टीझर प्रदर्शित, सायली संजीव आणि ऋषी सक्सेना येताय भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:52 IST2025-05-26T18:51:59+5:302025-05-26T18:52:49+5:30

दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा गूढरम्य टीझर प्रदर्शित झाला आहे.

Sayali Sanjeev And Rishi Saxena Starr Samsara Movie Teaser Launched Film Will Be Released On 20th June 2025 | 'समसारा'चा चित्तथरारक टीझर प्रदर्शित, सायली संजीव आणि ऋषी सक्सेना येताय भेटीला!

'समसारा'चा चित्तथरारक टीझर प्रदर्शित, सायली संजीव आणि ऋषी सक्सेना येताय भेटीला!

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) हे दोघेही मराठी कला क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. ते 'काहे दिया परदेस' (Kahe Diya Pardes) या मालिकेतून एकत्र काम करत होते. आता हे दोघे 'समसारा' (Samsara) या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा गूढरम्य टीझर प्रदर्शित झाला आहे.

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट "समसारा" हा चित्रपटात उलगडण्यात आली आहे. पार्श्वसंगीत, छायांकन, व्हिज्युअल इफेक्ट्सही उत्तम दर्जाचे असल्याचं टीझरमधून जाणवतं आहे. त्यामुळेच चित्रपटाचा टीझर अत्यंत रंजक आणि भयाचा अनुभव देणारा ठरलाय. या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे.

मराठी चित्रपटांत हॉरर प्रकार फारसा हाताळला गेलेला नाही. ही उणीव आता 'समसारा' हा चित्रपट भरून काढणार आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळेच 'समसारा'चं नेमकं गूढ काय आहे, या विषयी आता कुतूहल निर्माण झालं आहे. येत्या २० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Sayali Sanjeev And Rishi Saxena Starr Samsara Movie Teaser Launched Film Will Be Released On 20th June 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.