संतोषने का साजरी केली सेटवर दिवाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 02:26 IST2016-11-03T02:26:03+5:302016-11-03T02:26:03+5:30

प्रत्येकाने दिवाळी उत्साहात साजरी केली. कोणी शुभेच्छा देऊन तर कोणी फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटला.

Satyarthi celebrates Diwali on set? | संतोषने का साजरी केली सेटवर दिवाळी?

संतोषने का साजरी केली सेटवर दिवाळी?


मुंबई- प्रत्येकाने दिवाळी उत्साहात साजरी केली. कोणी शुभेच्छा देऊन तर कोणी फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटला. प्रत्येकाचे घर हे रांगोळी, प्रकाशमाळा आणि पणत्यांच्या प्रकाशांनी उजळून निघाले. अशा या आनंदाच्या क्षणी साहजिकच प्रत्येकाला वाटते की, हा उत्सव आपल्या फॅमिलीसोबत साजरा करावा. असेच काही अभिनेता संतोष जुवेकरला देखील जाणवले. संतोषला यंदाची दिवाळी ही फॅमिलीसोबत साजरी करण्यास मिळाली नाही याची खूप खंत वाटते. ृयाविषयी लोकमत सीएनएक्सने जाणून घेतले. संतोष सांगतो, माझ्या कुटुंबाला सोडून मी पहिल्यांदाच दिवाळी साजरी करतो आहे. याविषयी मला खूप वाईट वाटतेय. मी यंदा चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे दिवाळी पुण्यातच साजरी केली. या दिवसांमध्ये आई, बाबा आणि संपूर्ण फॅमिलीची खूप आठवण येत होती.
दिवाळीला फॅमिलीसोबत नसलो तरी, मी या दिवसांमध्ये काम करत होतो. या गोष्टीचा आनंददेखील आहे. ही दिवाळी मी सेटवरच साजरी केली. माझे सहकलाकार, आर्टिस्ट व फिल्मच्या युनिटबरोबर या सणाचा आनंद लुटला. शेवटी हे लोकदेखील आपल्याला फॅमिलीसारखेच असतात ना. संतोषने यापूर्वी झेंडा, एक तारा, फक्त लढ म्हणा यासारखे अनेक चित्रपट केले आहेत. सध्या तो ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतदेखील पाहायला मिळत आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याची दिवाळी मात्र कभी खुशी, कभी गममध्ये साजरी झाली असे म्हणावे लागेल.

Web Title: Satyarthi celebrates Diwali on set?