सलमानचा ट्रेनर डेजी शाहकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:47 IST2016-01-16T01:15:22+5:302016-02-13T02:47:28+5:30
स लमान खानने बॉलीवूडमध्ये बर्याच अभिनेत्रींना एन्ट्री मिळवून दिली आहे. अशाच अनेक अभिनेत्री आहेत ज्या कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे प्रश्न ...

सलमानचा ट्रेनर डेजी शाहकडे
स लमान खानने बॉलीवूडमध्ये बर्याच अभिनेत्रींना एन्ट्री मिळवून दिली आहे. अशाच अनेक अभिनेत्री आहेत ज्या कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे प्रश्न एसकेला विचारू शकतात. डेजी शाह 'हेट स्टोरी 3' मध्ये खुपच सेक्सी अवतारांत दिसणार आहे. तिच्या सेक्सी फिगरचे श्रेय जाते सलमान खानच्या ट्रेनरला. डेजीने जवळपास तीन किलो वजन घटवले असून सलमान तिला जास्तीत जास्त हॉट दिसण्यासाठी मदत करतो आहे. ती म्हणते की, ' एसके ने त्याचा ट्रेनर मला दिला आहे. हेट स्टोरी 3 मध्ये माझी बॉडी हॉट दिसावी म्हणून तो ट्रेनर माझ्याकडून व्यायाम करून घेतो. एसके म्हणजे फिटनेसचा मास्टरपीस आहे. मला वाटत नाही की, मी फिटनेसविषयक प्रश्न सलमान सोडून इतर कोणालाही विचारला असेल. मी वारंवार त्याच्याकडून फिटनेसविषयीच्या टिप्स घेत असते.