सलमानचा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला किस
By Admin | Updated: February 16, 2016 12:23 IST2016-02-16T10:25:17+5:302016-02-16T12:23:30+5:30
बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्यातील प्रियकर-प्रेयसीचे नाते संपले असले तरी, आजही ही जोडी माध्यमांमध्ये चर्चेत असते.

सलमानचा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला किस
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्यातील प्रियकर-प्रेयसीचे नाते संपले असले तरी, आजही ही जोडी माध्यमांमध्ये चर्चेत असते. सलमानच्या घरामध्ये आजही संगीताचा वावर दिसतो. त्यामुळे माध्यमांमध्ये या दोघांच्या नात्याची चर्चा होत असते.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार अलीकडेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सलमानची बहिण अर्पिताचा गोदभराईचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आलेल्या संगीताला गाडीपर्यंत सोडायला गेलेल्या सलमानने संगीताची किस घेतली आणि पुन्हा या जोडीची चर्चा सुरु झाली.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या कार्यक्रमात सलमान बराचवेळ संगीतासोबत होता. ऐश्वर्याचा अपवाद वगळता सलमानची आजही त्याच्या एक्स गर्लफ्रेंड बरोबर मैत्री आहे. अलीकडेच रणबीर बरोबर ब्रेकअप झालेली कतरिना कैफ सलमान बरोबर लाँग ड्राईव्हला गेली होती.