कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:45 IST2025-11-04T08:44:22+5:302025-11-04T08:45:08+5:30
काही दिवसांपूर्वी पोट पुढे आलेलं, पण आता सलमानचा लूक पाहून चाहतेही चकीत झाले आहेत.

कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
बॉलिवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिर या तीनही खानची नेहमीच चर्चा असते. काही महिन्यांपूर्वी आमिर खान ६० वर्षांचा झाला. तर नुकतंच शाहरुख खाननेही ६० वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. आता पाठोपाठ सलमान खानही पुढच्या महिन्यात ६० वर्षांचा होणार आहे. तीनही खान साठीत आले असले तरी त्यांचा चार्म अजून कायम आहे. फिटनेस, सिक्स पॅक अॅब्स आणि कडक बॉडी यासाठी सलमान खान आधीपासूनच सर्वांचा चाहता आहे. नुकतंच त्याने आपला टोन्ड बॉडी लूक फ्लॉन्ट केला आहे.
सलमान खान काही वर्षांपासून वेगळ्याच अवतारात दिसत होता. वाढलेलं वजन, पोट बाहेर आणि काही आजारांमुळे त्याच्या लूकमध्ये बराच फरक पडला होता. मात्र आता तो पुन्हा आपल्या आधीच्या शेपमध्ये येत आहे. आगामी सिनेमा 'बॅटल ऑफ गलवान'साठी तो खूप मेहनत घेत आहे. जिममध्ये घाम गाळत आहे. दिवस रात्र वर्कआऊट करत आहे. याचा फरक आता दिसू लागला आहे. सलमानने शर्टलेस अवतारात काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. साठीला आलेला असताना त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही चकीत झाले आहेत. सलमानने या फोटोंसोबत लिहिले, 'काहीही मिळवायचं असेल तर काही ना काही गमवावं लागतं...हे न गमावता केलं आहे'.
सुपरस्टार सलमानची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. काही मिनिटात पोस्टला ६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. सलमान खान इज बॅक अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. तसंच वरुण धवन, मनीष पॉल, अर्जुन बिजलानी यांनीही सलमानचं कौतुक केलं आहे. भाईजानचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. त्यात त्याच्या चेहऱ्यावरची क्युट स्माईल घायाळ करणारी आहे. 'भाईजान फिर दहाडने की तयारी कर रहे है','फिर से राज करने के लिए तयार' अशा कमेंट्स पोस्टवर आल्या आहेत.
सलमान खान सध्या 'बिग बॉस १९' होस्ट करत आहे. त्याच्या वीकेंड का वारची आजही तेवढीच क्रेझ आहे. तसंच तो 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे. त्याचे गेले काही सिनेमे जोरदार आपटल्याने आता या सिनेमाकडून त्याला आणि चाहत्यांनाही अपेक्षा आहेत.