सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:42 IST2025-07-27T17:41:59+5:302025-07-27T17:42:52+5:30

अभिनेत्रीने आदित्य यांच्यावर महिलांना फसवल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला सूरज पांचोली तिने जबाबदार म्हटलं आहे.

salman khan ex gf somy ali accused aditya pancholi and suraj pancholi for abusing women | सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीनेआदित्य पांचोली आणि त्यांचा लेक सूरज पांचोली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने आदित्य यांच्यावर महिलांना फसवल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला सूरज पांचोली तिने जबाबदार म्हटलं आहे. सोमी अलीने तिच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली होती. 

सोमी अलीने पोस्टमध्ये म्हटलं होतं की "आदित्य पांचोली तुम्ही महिलांना फसवता. तुम्ही त्यांना मारहाण करता आणि तुमचा मुलगा जिया खानच्या मृत्यूला जबाबदार आहे. तुम्ही एक कचरा आहात. तुम्ही असे कसं काय जगू शकता? सूरजलाही तुम्ही तेच शिकवत आहात. तुम्ही एक किसळवाणे मनुष्य आहात". पण नंतर सोमीने ही पोस्ट डिलीट केली आहे. 


सोमीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. दरम्यान, जून २०१३मध्ये अभिनेत्री जिया खान तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. जियाच्या मृत्यूचा आरोप अभिनेता सूरज पांचोलीवर करण्यात आला होता. पण, २०२३ मध्ये सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 

Web Title: salman khan ex gf somy ali accused aditya pancholi and suraj pancholi for abusing women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.