'तिला हात कशाला लावताय?' संजय लीला भन्साळींवर भडकला होता सलमान, सेटवर केली होती कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:35 PM2024-05-02T12:35:57+5:302024-05-02T12:36:48+5:30

Salman khan: 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवर झाला होता संजय लीला भन्साळी- सलमानमध्ये शाब्दिक वाद

salman-khan-asked-heeramandi-director-sanjay-leela-bhansali-not-to-touch-aishwarya-rai-during-hum-dil-de-chuke-sanam | 'तिला हात कशाला लावताय?' संजय लीला भन्साळींवर भडकला होता सलमान, सेटवर केली होती कानउघडणी

'तिला हात कशाला लावताय?' संजय लीला भन्साळींवर भडकला होता सलमान, सेटवर केली होती कानउघडणी

बॉलिवूडचा दबंग खान (salman khan) त्याच्या लव्हलाइफमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत त्याने बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं आहे. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत असलेलं त्याचं रिलेशन आजही कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतं. सलमानचं ऐश्वर्यावर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे तिच्यासोबत दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला पाहिल्यावर त्याचा रागाने तिळपापड व्हायचा. इतकंच नाही तर तिच्यामुळे त्याने चक्क संजय लीला भन्साळींसोबतही पंगा घेतला होता.

'हम दिल दे चुके सनम' या सिनेमात सलमान आणि ऐश्वर्या (aishwarya rai) या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत होते. याच सिनेमाच्या सेटवर असं काही घडलं होतं ज्यामुळे सलमानने सगळ्यांसमोर भन्साळींना झापलं होतं. अभिनेत्री स्मिता जयकरने (smita jaykar) याविषयी एक किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

'फिल्मी बीट'च्या रिपोर्टनुसार, 'हम दिल दे चुके सनम'मध्ये स्मिता जयकर यांनी ऐश्वर्याच्या आईची भूमिका साकारली होती. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेमाच्या सेटवर सलमान आणि संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansale) यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचं सांगितलं.

"या सिनेमातील आंखो की गुस्ताखियां" या गाण्यातील एक सीन मला आठवतोय. सलमान तिला सेटवर सगळीकडे शोधत होता आणि ती माझ्या बाजूलाच उभी होती. त्यावेळी संजय लीला भन्साळी तिला या गाण्यातील सीन समजावत होते. यावेळी त्यांनी सीन समजावतांना ऐश्वर्याला स्पर्श केला. जे पाहून सलमान भडकला. आणि, जवळ जात म्हणाला, संजय सर, तुम्ही तिला स्पर्श का करताय? तुम्ही हे असं करायला नकोय. तुम्हाला कळतंय ना जेव्हा नुकताच माणूस प्रेमात पडला असतो त्यावेळी त्याच्या मनात काय सुरु असतं. हे तेच आहे. त्यावेळी सलमानचं बोलणं ऐकून आम्ही सगळेच त्याच्याकडे पाहायला लागलो. पण, त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती", असं स्मिता जयकर म्हणाल्या.

Web Title: salman-khan-asked-heeramandi-director-sanjay-leela-bhansali-not-to-touch-aishwarya-rai-during-hum-dil-de-chuke-sanam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.