सलमानने दिली बजरंगी भाईजानची ‘ईदी’

By Admin | Updated: July 18, 2015 10:20 IST2015-07-18T04:44:39+5:302015-07-18T10:20:26+5:30

देशभरात जोरदार ओपनिंग : ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने पुन्हा एकदा आपले नशीब बॉक्स आॅफीसवर अजमावले आहे. सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ बॉक्स आॅफीसवर

Salman has given 'Bajrangi Bhaijaan's' Idi' | सलमानने दिली बजरंगी भाईजानची ‘ईदी’

सलमानने दिली बजरंगी भाईजानची ‘ईदी’

याआधीही अनेकांनी निवडला ईदचा मुहूर्त

देशभरात जोरदार ओपनिंग : ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने पुन्हा एकदा आपले नशीब बॉक्स आॅफीसवर अजमावले आहे. सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ बॉक्स आॅफीसवर आज दाखल झाला अन् देशभरात त्याला जोरदार ओपनिंग मिळाले.

मागच्या काही वर्षांत रमजान ईद आणि बॉलीवूडच्या चित्रपटांचे एक अदृश्य नाते तयार झाले. असे नाते स्थापित करण्यासाठी सलमान खान याने मोठी भूमिका वठवली आहे. २००९ पासून सलमान खान प्रत्येक ईदच्या मुहूर्तावर आपला चित्रपट प्रदर्शित करतोय. २००९ साली ‘वॉन्टेड’ (९० कोटी), २०१० साली ‘दबंग’ (१५० कोटी), २०११ साली ‘बॉडीगार्ड’ (१५० कोटी), २०१२ साली ‘एक था टायगर’ (२०० कोटी) हे चित्रपट प्रदर्शित झाले. सलमान खानला प्रत्येक वर्षी उच्च स्थानावर नेण्यास हे चित्रपट यशस्वी ठरल्याने साहजिकच इतर नायकही त्याच दिशेने वळले आहेत. या ईदला व २०१६ मध्ये येणाऱ्या ईदलाही असेच चित्र दिसणार आहे. त्याचाच हा रंजक आढावा...

शाहरूख खान आपला ‘फॅन’ हा चित्रपट बकरी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करणार आहे. इतर कोणत्याही डेट्स उपलब्ध नसल्यानेच आपण हा चित्रपट बकरी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करीत असल्याचं शाहरूख खाननं म्हटलं आहे. यावर्षी ईदला (१८ किंवा १९ जुलै) ‘बजरंगी भाईजान’, ‘ईश्क क्लिक’ हे चित्रपट रिलीज होत आहेत. सलमान खानला ‘बजरंगी भाईजान’कडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या नक्कीच पूर्ण होतील, असे आता दिसायला लागले आहे.

Web Title: Salman has given 'Bajrangi Bhaijaan's' Idi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.