"विराट रिटायर होण्यास कोण कारणीभूत ठरलं?" कोहलीच्या निवृत्ती घोषणेनंतर सलील कुलकर्णींना वेगळीच शंका, म्हणाले- 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:46 IST2025-05-12T16:44:28+5:302025-05-12T16:46:39+5:30

विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. सलील कुलकर्णींनी विराटच्या रिटायरमेंटवर प्रश्न उपस्थित केले आहेत

Saleel Kulkarni post after virat Kohli retirement announcement from test cricket | "विराट रिटायर होण्यास कोण कारणीभूत ठरलं?" कोहलीच्या निवृत्ती घोषणेनंतर सलील कुलकर्णींना वेगळीच शंका, म्हणाले- 

"विराट रिटायर होण्यास कोण कारणीभूत ठरलं?" कोहलीच्या निवृत्ती घोषणेनंतर सलील कुलकर्णींना वेगळीच शंका, म्हणाले- 

किंग कोहली नावाने जगप्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू विराट कोहलीने (virat kohli) आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटने अचानक घेतलेल्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. विराट कोहलीआधी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू रोहित शर्मानेही (rohit sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराटने निवृत्तीची घोषणा केल्यावर संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णींनी विराटची रिटायरमेंट (virat kohli retirement) रहस्यमयी असं म्हटलं आहे. काय म्हणाले सलील कुलकर्णी?

सलील कुलकर्णींची पोस्ट

सलील कुलकर्णींनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "१०, ००० रन्सच्या इतक्या जवळ असताना , फिटनेस आणि खेळण्याची भूक २००% असतांना विराट रिटायर का झाला ? विराटला कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्त होण्यामागे कोणती गोष्ट कारणीभूत ठरली? काहीतरी रहस्यमयी वाटतंय. या चॅम्पियन प्लेअरसाठी खरंच वाईट वाटतंय. विराटला ऑनफील्ड एक खास सेंड ऑफ मिळायला हवा होता. आणि हे सुद्धा कमीतकमी तीन वर्षांनंतर." अशी पोस्ट लिहून डॉ. सलील कुलकर्णींनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.


विराटची रिटायरमेंटची घोषणा

काही दिवसांपूर्वीच  कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीसंदर्भातील  बीसीसीआयला कळवल्याची माहिती समोर आली होती. बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंतीही केली होती. पण  विराट कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीनं ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ७ द्विशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.  विराटच्या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसलाय.

Web Title: Saleel Kulkarni post after virat Kohli retirement announcement from test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.