साजिद खानवर भाळली हवाईसुंदरी

By Admin | Updated: October 10, 2016 02:55 IST2016-10-10T02:54:29+5:302016-10-10T02:55:19+5:30

बायकांना इंप्रेस करण्यात दिग्दर्शक साजिद खान एकदम माहिर आहे. खुद्द साजिदचा मित्र रितेश देशमुख यानेच हा खुलासा केलाय. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर

Sajid khan hoaxed airspace | साजिद खानवर भाळली हवाईसुंदरी

साजिद खानवर भाळली हवाईसुंदरी

बायकांना इंप्रेस करण्यात दिग्दर्शक साजिद खान एकदम माहिर आहे. खुद्द साजिदचा मित्र रितेश देशमुख यानेच हा खुलासा केलाय. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर रितेशने साजिदची अनेक गुपितं उघड केलीत. यापैकीच एक म्हणजे, साजिद महिलांना इंप्रेस करण्यात अगदीच निपुण आहे. होय, विमानात बसल्याबसल्या साजिदने एका हवाईसुंदरीला कसे अगदी अलगद आपल्या मोहपाशात अडकवले होते, याचा किस्सा रितेशने यावेळी सांगितला. काही वर्षांपूर्वी रितेश व साजिद एका अ‍ॅवार्ड फंक्शनच्या निमित्ताने एकत्र विदेशात गेले होते. दोघेही प्रथमच बिझनेस क्लासने विमानप्रवास करत होते. त्यामुळे दोघेही आनंदात होते. याचदरम्यान साजिदने आपल्या हसतमुख चेहऱ्याने आणि गोड गोड गप्पांनी एका हवाईसुंदरीला चांगलेच प्रभावित केले. यानंतर अख्ख्या विमानप्रवासात ही हवाईसुंदरी साजिदची विशेष काळजी घेताना दिसली. लंचनंतर या हवाईसुंदरीने साजिदला ‘हाऊ इज द लंच?’ असा प्रश्न केला. यावर साजिदने काय करावे, तर क्षणाचाही विलंब न करता त्या हवाईसुंदरीचा मोबाईल नंबर मागितला. विशेष म्हणजे तिने तो साजिदला दिलाही. हा किस्सा सांगताना रितेशला हसू आवरेनासे झाले.

Web Title: Sajid khan hoaxed airspace