'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:03 IST2025-07-25T09:02:30+5:302025-07-25T09:03:20+5:30

२१ व्या वर्षी अहान पांडे कसा होता? युट्यूबरने केला खुलासा

saiyaara fame ahaan panday was a chain smoker youtuber spills the beans | 'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."

'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."

'सैयारा' (Saiyaara) सिनेमाची सध्या थिएटर्समध्ये धूम आहे. तरुणाई अक्षरश: सिनेमासाठी वेडी झाली आहे. थिएटरमध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कोणी रडतंय तर कोणी रुग्णालयातून हाताला आयव्ही लावून सिनेमाला बघायला आलं आहे. अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा या नवोदित कलाकारांनी तरुणाईला प्रेमातच पाडलं आहे. अहान पांडे हा चंकी पांडेचा पुतण्या आहे. हा त्याचा पहिलाच सिनेमा असून त्याने पदार्पणातच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अहान पांडे चेन स्मोकर होता असं म्हणत एका युट्यूबरने त्याची पोलखोल केली आहे.

युट्यूबर निखिल पांडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये निखिल अहानच्या अॅक्टिंग वर्कशॉपच्या दिवसांबद्दल बोलत आहे. तो म्हणतो, "अहान पांडे...वर्कशॉपमध्ये माझ्यासोबत होता. २१ चेन स्मोकर होता. तो २१ वर्षांचा होता जो फक्त एक अभिनेता बनण्याच्या प्रयत्नात होता. खरं तर तो ग्रेट अभिनेता आहे. सांगायला विचित्र वाटतंय पण मला त्याचा द्वेष वाटायचा. तो नेहमी उशिरा यायचा, फिल्मी कुटुंबातला मुलगा..एकप्रकारे डूशबॅग, पण कॅमेऱ्यासमोर शानदार."

Nikhil Pandey (youtuber/podcaster/digital marketer) talks about meeting Ahaan Pandey at an acting workshop
byu/kokotara inBollyBlindsNGossip

तो पुढे म्हणाला, "अहानला एक गे लव्ह सीन देण्यात आला होता. त्याला त्याच्या गे पार्टनरला औषध द्यायचं असतं असा तो सीन होता. कारण त्याच्या पार्टनरला एड्स असतो. सीन खूपच भयानक होता. तो सीन मला मिळाला नाही म्हणून मी खूश झालो. तो सीन अहानने घेतला. त्याने तो सीन खूपच दर्जेदार केला होता. त्याने सरळ त्या मुलासोबत मेड आऊट केलं. त्याने त्या मुलाला आधी याची कल्पनाही दिली नव्हती. बस...त्याने केलं आणि तो एक कमिटेड अभिनेता होता."

'सैयारा'ने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर १७२.५१ कोटींची कमाई केली आहे. ज्या प्रकारे सिनेमाची क्रेझ आहे त्यावरुन काही दिवसात सिनेमा २०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेईल. चाहतेच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही पोस्ट शेअर 'सैयारा'च्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

Web Title: saiyaara fame ahaan panday was a chain smoker youtuber spills the beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.