Saif Ali Khan Property: सैफ अली खान 5000 कोटींच्या संपत्तीचा मालक; इच्छा असून सारा, तैमूरला काहीही देऊ शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 10:53 IST2021-10-27T10:53:36+5:302021-10-27T10:53:56+5:30
Saif Ali Khan Property dispute: सैफ अली खान यांचे पणजोबा हामिदुल्लाह खान ब्रिटिशांच्या काळात नवाब होते. सैफ अली खान हा बॉलिवुडमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. कारण तो पटौदीचा नवाब आहे. यामुळेच त्याला बॉलिवुडचा नवाब म्हटले जाते.

Saif Ali Khan Property: सैफ अली खान 5000 कोटींच्या संपत्तीचा मालक; इच्छा असून सारा, तैमूरला काहीही देऊ शकत नाही
सैफ अली खान (Saif Ali Khan) हा बॉलिवुडमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. कारण तो पटौदीचा नवाब आहे. यामुळेच त्याला बॉलिवुडचा नवाब म्हटले जाते. सैफ अली खान हा वर्षाला सिनेमे आणि जाहिरातींमधून खूप सारे पैसे कमवतो. याशिवाय त्याच्याकडे पूर्वजांची एवढी संपत्ती आहे की काही पिढ्या बसून खाऊ शकतात. परंतू, यातील तो एक छदामही आपल्या मुलांना देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे.
सैफ अली खानकडे हरियाणाचा पटौदी पॅलेस आणि भोपाळमध्ये वडिलोपार्जित संपत्ती पकडून 5000 कोटींची मालमत्ता आहे. एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक असूनही तो आपल्या मुलांना यातील काही देऊ शकत नाही, ही एक आश्चर्यकारक बाब आहे.
राजघराण्यातील प्रसिद्ध असलेले दुसरे नाव म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे. त्यांच्याकडेही सैफपेक्षा जास्त पटींनी संपत्ती आहे. परंतू त्यांची संपत्ती त्यांच्या तीन आत्या आणि शिंदे यांच्यात वाद असल्याने अडकलेली आहे. शिंदे यांच्या आजीने मृत्यूपत्र केल्याने शिंदे जरी सुटलेले असले तरी सैफ मात्र अडकला आहे.
सैफ अली खान यांचे पणजोबा हामिदुल्लाह खान ब्रिटिशांच्या काळात नवाब होते. मात्र, त्यांनी आपल्या संपत्तीचे कोणतेही मृत्यूपत्र बनविले नव्हते. यामुळे कुटुंबामध्ये संपत्तीवरून वाद सुरु आहेत. रिपोर्ट्स नुसार सैफची एक नातेवाईक पाकिस्तानात राहत होती. तिच्या वारसदारांशी या मालमत्तेवरून वाद सुरु आहेत.
सैफच्या कुटुंबाबत बोलायचे झाले तर त्याचे पहिले लग्न अमृता सिंहसोबत झाले होते. नंतर त्यांचा तलाक झाला. तिच्यापासून सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले झाली. यानंतर सैफने करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. तिच्यापासून सैफला तैमूर आमि जेह नावाची दोन मुले आहेत. हजारो कोटींची मालमत्ता असलेला सैफ वडिलोपार्जित संपत्तीतून काहीच या चारही मुलांना देऊ शकत नाही.
हे आहे कारण....
खरेतर याच्या मागे एक मोठे कारण आहे. सैफची जेवढी काही वडिलोपार्जित संपत्ती आहे ती भारत सरकारच्या एनिमि डिस्प्यूट अॅक्ट अंतर्गत येते. या कायद्यानुसार संपत्तीवर कोणीही आपली मालकी सांगू शकत नाही. जर कोणी विरोध केला तर त्याला आधी उच्च न्यायालय आणि तिथे त्याच्या बाजुने निकाल नाही लागला तर सर्वोच्च न्यायालयात जावे लागते. तिथेही काही हाती आले नाही तर अखेर राष्ट्रपतींच्या हाती यावर निर्णय देण्याचा अधिकार असतो. हा सर्वात मोठा पेच आहे. म्हैसूरचे राजघराणे गेल्या अनेक वर्षांपासून ही लढाई लढत आहे.