'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:59 IST2025-06-24T15:58:38+5:302025-06-24T15:59:24+5:30

नुकतंच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही सचिन पिळगांवकरांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महागुरुंनी केलेला दावा पुन्हा चर्चेत आला. 

sachin pilgaonkar video where he stated that he taught dialogue to gabbar singh while filming sholay | 'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video

'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video

अभिनेते, दिग्दर्शक, गायक अशी बहुगुणी ओळख असलेले सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) अचानक पुन्हा ट्रोल होत आहेत. 'शोले' सिनेमात गब्बर सिंगला त्यांनीच डबिंग शिकवली होती असं म्हणाले होते. त्यावरुन नुकतंच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही सचिन पिळगांवकरांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महागुरुंनी केलेला दावा पुन्हा चर्चेत आला. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर सांगत आहेत की, "त्यावेळचे सगळे सीन्स एकत्र केल्यावर काही लोकांना असं वाटलं की अमजदचा आवाज हा गब्बर सिंगचा आवाज वाटत नाहीये. तो थोडासा पातळ वाटतोय. थोडासा वरच्या सुराचा वाटतोय. त्यामुळे काही लोकांनी रमेशजींना सुचवलं की आपण दुसऱ्या कोणाकडून डबिंग करुन घेऊया. ते जर झालं असतं तर अमजदचं करिअर संपलं असतं. म्हणजे  आम्ही तर तेव्हा म्हणायचो की हा या पिक्चरनंतर सुपरस्टार होणार. ते झालं नसतं."


"मी डायरेक्शन डिपार्टमेंटमधला असल्याने आणि रमेशजींचा थोडासा लाडका असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की असं करु नका. ते म्हणाले,'उसकी आवाज पतली लग रही है'. मी म्हणालो, 'पायलट मे लग रही है ना'. तुम्ही इतक्या वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहात म्हणल्यावर तुम्हाला इतका तर अंदाज असेलच की पायलट आणि डबिंगमध्ये किती फरक असतो. डबिंग करुन तर पाहा. ते म्हणाले,'मुझे नही लगता, बहुत बडा स्टेक है, रिस्क नही ले सकता.' मी त्यांना म्हणालो मला तीन दिवस द्या. एक सीन डब करुन ऐकवतो मग तुम्ही निर्णय घ्या. मग मी सकाळी अमजदला पाच वाजता घ्यायला जायचो. सहा ते सात एक तासच डबिंग करायचो. कारण सकाळी आवाजात जो बेस असतो ना तो दिवसभरात कधीच नसतो. पहाटे पहाटे आवाज वेगळा लागतो. फक्त चहा प्यायचा, काही खायचं नाही, मी टॅक्सी घेऊन त्याला घ्यायला जायतो. साडेपाच वाजता सगळं तयार असायचं. त्याला माईकसमोर उभं करायचो. रेकॉर्डिस्टला ट्रेबल एकदम बंद करुन बेस वाढवायला सांगितलं. अमजदला सांगितलं की माईकजवळ उभा राहून बोल. वेगळा आवाज काढायचा प्रयत्नही करु नकोस हे मी त्याला सांगितलं. मी गायकही आहे त्यामुळे मला त्यातले ऑक्टिम्स कळतात. माझ्या मागे तो अनुभव होता जो अमजदच्या मागे नव्हता. कारण तो त्याचा पहिला पिक्चर होता."

"रमेशजींना मी नंतर ते डबिंग ऐकवलं. त्यांनी तीन वेळा ऐकलं आणि अखेर अमजदच डबिंग करेल असा निर्णय घेतला.  मी अमजदला फोन करुन हे सांगितलं तेव्हा तो आनंदाने उड्या मारायला लागला.", असंही ते म्हणाले.

Web Title: sachin pilgaonkar video where he stated that he taught dialogue to gabbar singh while filming sholay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.